You are currently viewing कुडाळ राष्ट्रीय काँग्रेस आयोजित बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ राष्ट्रीय काँग्रेस आयोजित बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ राष्ट्रीय काँग्रेस आयोजित बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सतीश आळवे प्रथम क्रमांकाचे मानकारी

कुडाळ

तालुक्यातील. कुडाळ तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सतीश आळवे (लक्ष्मीवाडी) प्रथम क्रमांकाचा मानकारी ठरला. तालुक्यातील १० बैलगाडी स्पर्धेत आणि १० ते १५ सुदृढ बैल सहभागी झाले होते.
तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने बैलगाडी सजावट स्पर्धा व सुदृढ बैल प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन ठाकरे येथील जिजामाता चौक येथे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
त्यानंतर बैलगाडी आणि बैलांची मिरवणूक काढण्यात आली. जिजामाता चौक येथून ही मिरवणूक गांधी चौक मार्गे- मारुती मंदिर- वर्दम तिठा- बाबाचांद दर्गा – पानबाजार ते गुलमोहर हॉटेल अशी काढण्यात आली. गुलमोहर हॉटेलकडे या स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.
यावेळी प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, ठाकरे गट युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, माजी जि. प. सदस्य अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तबरेज शेख, शहराध्यक्ष तौसिफ शेख, सुंदरवल्ली स्वामी, शहराध्यक्ष शुभांगी काळसेकर, सोनल सावंत, श्रावणी शिरसाट, वैभव आजगावकर, रोहन काणेकर, अनंत खटावकर, शेतकरी संघटनेचे अवी शिरसाट, अप्पू राणे, बंड्या मांजरेकर, शाहिद शेख व बैल मालक उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरित निकाल :- द्वितीय क्रमांक संजय सावंत (तुपटवाडी) व तृतीय श्री. साईल (पंणदूर) यांनी मिळविला. सर्व सहभागी स्पर्धकांना मानधन देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण महेश परब यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील शेतकरी संघटना व तब्रेज शेख तोसिफ शेख यांनी मेहनत घेतली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा