You are currently viewing राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळाकडून कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा सन्मान

राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळाकडून कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा सन्मान

कणकवली :

 

कणकवली नगरपंचायत, सफाई कामगारांचा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाकडून सन्मान करण्यात आला.

कणकवली नगरपंचायत सफाई कामगारांचा “दिपावली चे औचित्य साधून” किशोर धुमाळे, सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत “अभ्यंग स्नानासाठी आवश्यक साहित्य” प्रदान करून, राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने सन्मानित केले.

वर्षाचे ३६५ दिवस, ऊन वारा, पाऊस, नैसर्गिक आपत्ती याचा कोणताही विचार न करता, तसेच आपल्या घरचे सनवार यांचा विचार न करता.कणकवलीकराची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचा सन्मान करताना मला शब्द हि सुचत नाहीत, असे मनोगत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केले आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

या अचानक आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा मुळे आम्ही भारावून गेलो, असे सर्व सफाई कामगारांच्या भावना सर्वच कामगारांनी बोलुन दाखवल्या, आणि पेडणेकर मित्र मंडळाचे आभार मानले.यावेळी सतीश कांबळे, आणि नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते, पेडणेकर यांच्या मित्र मंडळाचे प्रसाद पाताडे, प्रभाकर कदम, बाबुराव घाडीगावकर, अविनाश गावडे, आणि व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा