तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या युवकाचा आज मृतदेह सापडला
मालवण
तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या मुरगूड, कागल येथील आदित्य पांडुरंग पाटील या युवकाचा आज शनिवारी दुपारी तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडून आला असून मयत आदित्य याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे
कागल तालुक्यातील मुरगूड येथील एका संगणक प्रशिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी काल शुक्रवारी मालवण तारकर्ली येथे सहली साठी आले होते. हे विद्यार्थी तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्राच्या पाण्यात स्नानासाठी उतरले असताना या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी समुद्राच्या लाटे बरोबर खोल समुद्रात ओढले जात होते. या विद्यार्थ्यांना बुडण्यापासून वाचविण्यात यश आले. मात्र मृत आदित्य हा एका मोठ्या लाटे बरोबर समुद्रात दिसेनासा झाला. बराच वेळ शोध कार्य करूनही आदित्यचा शोध लागला नव्हता. सायंकाळीं अंधार पडल्यामुळे हे शोध कार्य थांबविण्यात आले होते.
दरम्यान शनिवारी सकाळी पुन्हा मालवण पोलिसांच्या नेतृत्वाखाली तारकर्ली समुद्रात दोन बोटींच्या साहाय्याने शोध मोहीम राबविण्यात आली.
मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी स्थानिकांच्या मदतीने ही शोध मोहीम हाती घेतली होती. मालवण पोलीस दलाची सागरी सुरक्षितेसाठी तैनात असलेली स्पीड बोट आणि तारकर्ली येथील प्रफुल्ल मांजरेकर यांच्या बोटीने तारकर्ली समुद्रात खोल पर्यंत बेपत्ता आदित्य याचा शोध सुरू होता.
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सोबत या शोध मोहिम मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर शिवराज झांझुरे, पो. कॉ. श्री पाटील आदी उपस्थित होते. तारकर्ली येथे सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुभाष शिवगण, पो. कॉ. विश्वास पाटील, पोलीस पाटील भानुदास येरागी, बाबू ढोले, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, कपिल चव्हाण, संकेत तारी, बाबू लोणे यांसह अन्य शोध मोहिमेत सहभागी झाले होते.
संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*