समता महिला मंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास दोन वॉटर प्युरिफायर भेट…
सावंतवाडी
समता महिला मंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन हायटेक एक्वा वॉटर प्युरिफायर भेट स्वरूपात देण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या हस्ते व समता महिला मंडळाच्या ज्येष्ठ महिला सदस्यांच्या उपस्थितीत आज याच लोकार्पण करण्यात आलं. उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणी मिळाव या दृष्टीनं हा उपक्रम समता महिला मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात आला.
समता महिला मंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास हे दोन वॉटर प्युरिफायर भेट स्वरूपात देण्यात आले. याच लोकार्पण शुक्रवारी करण्यात आलं. एक लाख रुपये किंमतीचे हे प्युरिफायर असून पुढील पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देखील महिलांनी स्वीकारली आहे. तर चांगलं शुद्ध पाणी रूग्णांना व नातेवाईकांना देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही वैद्यकीय अधिक्षकांनी दिली आहे. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे म्हणाले, वॉटर प्युरिफायरची गरज ओळखून समता महिला मंडळान ही भेट दिली आहे. योग्य ठिकाणी ही भेट दिली असून त्यांच कौतुक कराव तेवढं कमी आहे. रूग्णांना शुद्ध पाणी मिळाव यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील. तर आपल्याकडे दाखल नऊ पीजी डॉक्टर सेवा देत आहेत. ते शिकाऊ नाही आहेत. जनतेने हा गैरसमज दूर करावा. एमडी, एमएस करणारे हे डॉक्टर असून यांना चांगलं सहकार्य केलं तर अजून सहा महिन्यांनी हेच पुर्णवेळ सेवेत रुजू होतील. हे शिकाऊ नाहीत, दोन दोन वर्षे सेवा दिलेले डॉक्टर आहेत. सहा महिन्यात परिक्षा झाल्यावर ते सेवेत रुजू होतील. हे तज्ञ डॉक्टर असून त्यांची अवहेलना होऊ नये याची काळजी घ्यावी, सावंतवाडीची संस्कृती ही आदरातिथ्याची आहे. जनतेला चांगली सेवा देण्याच काम करू असं मत त्यांनी व्यक्त केल. तर जेव्हा महिला घरातून बाहेर पडण्यासाठी मुभा नव्हती तेव्हा हे मंडळ स्थापन झालं. या निमित्ताने महिला एकत्र येऊ लागल्या. या वृक्षाच आज वटवृक्ष झाल आहे. सावंतवाडीतील महिलांसाठीची ही पहिली संस्था आहे. नवी पिढी हे कार्य पुढे घेऊन जात आहे याचा आनंद होत आहे अशी भावना ज्येष्ठ सदस्य सुनीता लेले यांनी व्यक्त केली.
मंडळाच्या अध्यक्षा तेजश्री मळगावकर म्हणाल्या, १९७७ ला या मंडळाची स्थापना झाली. गेली ४५ वर्ष महिला आपल्या बचतीतील निधी संकलन करून महिला विविध उपक्रम राबवितात. त्यातील जमलेल्या रक्कमेतून आज हे वॉटर प्युरिफायर देण्यात आले आहेत. महिलांना प्राधान्य देण्यासाठी हे मंडळ कार्यरत आहे. त्यातुनच पाणी अर्थात जीवन हॉस्पिटलच्या ठिकाणी देण्याच काम आमच्या मंडळान केले आहे असं त्या म्हणाल्या. सीमा मठकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. गिरीश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, १०८ चे डिस्ट्रिक्ट मॅनेजर विनायक पाटील, समता मंडळाच्या अध्यक्ष तेजश्री मळगावकर, सेक्रेटरी अश्विनी दळवी, खजिनदार छाया जगताप, सुनिता लेले, किशोरी गवाणकर, सीमा मठकर, मोहिनी मडगावकर, सुनिता परब, स्नेहा वझे, नेत्रा मुळये, आशा पालव, विना म्हाडगूत, गायत्री देवस्थळी, भारती मठकर, भारती भाट, सुनिता टकेकर, मिहीर मठकर, डॉ. आकाश हेडगे, डॉ.श्रद्धा बोरा, चिन्मय डाकलीयर, आमशुला कोचुरी, वैभव भिसने, सुजाता परब, रोहन परब, उज्वला कालेलकर आदी उपस्थित होते.
संवाद मीडिया*
*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*
*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*
*सेल्समन : पदवीधर आवश्यक*
*आकर्षक पगार*
**स्थानिकांना प्राधान्य**
*संपर्क*
*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*
*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*
*📲9822123102*
*📲9423053459*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*