You are currently viewing चार महिन्यांच्या ‘लॉक डाऊन’नंतर गोवा राज्याच्या सीमा उद्यापासून खुल्या!

चार महिन्यांच्या ‘लॉक डाऊन’नंतर गोवा राज्याच्या सीमा उद्यापासून खुल्या!

नोकरी करणाऱ्या शेकडो युवकांचा मार्ग मोकळा

गोवा :

तब्बल चार महिन्यांच्या लॉक डाऊननंतर अखेर गोव्याच्या सीमा सर्वांसाठी उद्यापासून खुल्या होणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सायंकाळी उशिरा पत्रकार परिषद घेवून हे जाहीर केले. गोवा सरकार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणार आहे. त्यामुळे यापुढे गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणी सक्तीची राहणार नाही. स्वत:ची काळजी स्वतःच घ्या, सामाजिक अंतर, मास्क आणि सेनिटायझर्सचा वापर करावा तसेच जराही लक्षणे आढळल्यास त्वरीत चाचणी करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. गोव्याने घेतलेल्या या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील शेकडो युवकांचा आता गोव्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लॉक डाऊननंतर अनेक जण कोविड टेस्ट व कोरोंटाईनमुळे गावीच अडकून पडले होते या सर्वांना ही आता गोव्यात परत देण्याचा मार्ग खुला झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा