You are currently viewing बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सेंट्रल स्कूलमध्ये गोवत्स पूजन व गोवत्स नामकरणचा अनोखा सोहळा संपन्न

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सेंट्रल स्कूलमध्ये गोवत्स पूजन व गोवत्स नामकरणचा अनोखा सोहळा संपन्न

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सेंट्रल स्कूलमध्ये गोवत्स पूजन व गोवत्स नामकरणचा अनोखा सोहळा संपन्न

कुडाळ

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सेंट्रल स्कूल तर्फे वसूबारस सणानिमित्ताने शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये बांधलेल्या गोशाळेतील गायींचे , तसेच गोवत्स पूजन व नूतन पाडसाचा नामकरण सोहळा शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर , प्राचार्या सौ.शुभांगी लोकरे , प्रसाद कानडे व सी बी एस इ सेंट्रल स्कूलचे स्टाफ, विविध शिक्षण क्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला.

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आणि सहकाऱ्यांनी कुडाळ येथे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेची स्थापना केली व शिक्षण संस्थेतील विविध अभ्यासक्रमाबरोरच विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान मिळावे, कृषीजन संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये गोशाळा बांधली असून त्या गोशाळेतील गाईंचे व त्यांच्या वासरांचे (गोवत्सपूजन) व नूतन पाडसाचे नामकरण शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये नुकतेच करण्यात आले. त्या नूतन पाडसाचे “गौरी” असे नामकरण करण्यात आले .

. शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये गोशाळा बांधून एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये केला आहे . हिंदू संस्कृतीमध्ये असणारे गोमातेचे महत्त्व शिक्षकांनी अधोरेखीत करताना शेतीअभ्यासक्रम, उद्यानविद्या या विषयाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शेतीवर आधारित व्यवसाय करताना गाय, पाळीव प्राणी, शेती अवजारे यांचे शेतीमध्ये असणारे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्याप्रती विद्यार्थ्यांना आस्था असणे गरजेचे आहे आणि त्या संदर्भातील एक महत्त्वाचा भाग म्हणून बॅ.नाथ पै सीबीएससी बोर्डाच्या सेंटर स्कूलच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांना या गोशाळेतील गाई वासरांच्या मार्फत प्रात्यक्षिकासह ज्ञान दिले जाते.
सध्या या गोशाळेतमध्ये चार गाई त्यांच्या वासरांसह आनंदाने वास्तव्य करत असतात . सेंट्रल स्कूलच्या शिक्षकांचा हा एक स्तुत्य उपक्रम म्हणून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा