You are currently viewing साटेलीतील मायनिंग नेण्यापूर्वी नुकसानग्रस्तांचा विचार करा – संजय नाईक

साटेलीतील मायनिंग नेण्यापूर्वी नुकसानग्रस्तांचा विचार करा – संजय नाईक

साटेलीतील मायनिंग नेण्यापूर्वी नुकसानग्रस्तांचा विचार करा – संजय नाईक

दोडामार्ग

साटेली तर्फ सातार्डा गावातील मायनिंगमुळे जमीनदार, शेतकरी, बागायतदार, डंपर व्यावसायिक, मायनिंग क्षेत्रात काम करणारे कामगार तसेच ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हरिदलावादाचे नियम धाब्यावर बसवून मायनिंग सुरू केले. दिवाळी तोंडावर असून साठवून(डंप) ठेवलेला मायनिंगचा माल नेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. परंतु नुकसानग्रस्तांचा विचार न केल्यास संबंधितांना ग्रामस्थांच्या तीव्र विरोधास सामोरे जावे लागेल असा इशारा, साटेलीतील सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

श्री. नाईक म्हणाले की, साटेली तर्फ सातार्डा येथे असलेल्या मायनिंग कंपनीने हरिदलावादाचे नियम धाब्यावर बसवून काजू, आंबा, नारळ, सुपारी बागायत शेतकऱ्यांचे नुकसान केले. डंपर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी महिलांनी अंगावरचे दाग दागिने विकून डंपर घेतले. परंतु सद्यस्थितीत बँकांची कर्ज फेडताना डंपर व्यावसायिकांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यामुळे ‘तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटण’ अशी अवस्था मायनिंग प्रकल्पाने केल्याचे संजय नाईक यांनी सांगितले.
सोने मिळणारे मायनिंग अशी ओळख साटेली गावची माध्यमांमुळे झाली. मात्र सद्यस्थितीत माळीन सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी अवस्था येथील मायनिंग परिसराची झाली आहे. या मायनिंग शेजारी घरे, वाड्या, वस्ती, पाणी, देवस्थान अशी रचना आहे. त्यामुळे गावाला नुकसान पोहोचविणाऱ्या अशा मायनिंग प्रकल्पांच्या एजंटांना कायमच विरोध राहील. यात कुठल्याही राजकीय पक्ष, पुढारी, नेते अथवा स्वयंघोषित मायनिंग लीडर यांनी पडू नये. अन्यथा कायदेशीर कारवाईची तीव्र लढाई लढत हरिदलवादाकडे दाद मागणार असून वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी दिला.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा