You are currently viewing मन…

मन…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन…*

 

मन पांखरू पांखरू काय सांगू याची बात

कधी उडते आभाळी कधी रडे घरट्यात

रोज रोज पहाव्यात अंगी याच्या नाना कळा

कधी बनते दगड कधी लावते हो लळा…

 

अणुरेणू बनते नि जग सामावते त्यात

क्षणातच बघावे त् बसे जाऊन ढगात

फुटे पाझर नयनी डोकावते झोपडीत

का रे अन्याय इतका मनोमनी खंतावतं…

 

मन मोहरी मोहरी कधी बनते पहाड

मनासारखे नाहीच जगी पहा कुणी द्वाड

कधी बनते हिंमत कधी सश्याहून भ्याड

मनासारखे ना कोणी एकमेव “बिनतोड”…

 

मन हिरवा तो वड त्यात सामावते सारे

नाना विचारांची त्यात किती विविध पांखरे

कोणी बोलते मधुर कोणी मारतात चोची

मन मनाचीच होते सर्व बाजुंनी ती गोची…

 

मन गोड गोड गरा, जणू फणस नारळ

जणू वाटते तयाला दहा हत्तींचेच बळ

मन मेणाहून मऊ दु:ख दिसता पाझरे

कोणी बोलता वाकडे किती पडती हो”घरे..

 

मन असे मन तसे कधी लागतो ना थांग

आभाळाहून विस्तृत सागराहून अथांग

कधी सापडे ना तळ नाही उंची ही कळली

मन इतके चंचल नाही तपस्या फळली…

 

 

प्रा.सौ.सुमती पवार UK

(9763605642)

 

*संवाद मिडिया*

 

*गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..🏍️🏍️*

 

*Advt Link👇*

————————————————-

🏍️ *गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..* 🏍️

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME – फक्त रु. 999/- डाऊनपेमेंटमध्ये..*💥

 

👉 अधिक एक्सचेंज बेनिफिट

 

👉 फ्लिपकार्ट बुकिंगवर ही कॅश डिस्काउंट 💷

 

👉 5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास…😇

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा