You are currently viewing सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा शिरोडकर डंपरच्या धडकेत जखमी

सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा शिरोडकर डंपरच्या धडकेत जखमी

सावंतवाडी
तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा शिरोडकर यांच्या कारला बुर्डी पुलाजवळ समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या असून येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच त्यांच्यासोबत आरोग्य सेवक संतोष तुळसकर प्रवास करत होते ते ही जखमी झाले असल्याचे सावंतवाडी वैद्यकीय अधिकारी डॉ.उत्तम पाटील यांनी माहिती दिली.
दरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, पंचनामा सुरू आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा