खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून रस्त्यांना मंजुरी : रुपेश राऊळ यांनी दिली माहिती
सावंतवाडी
प्रधानमंत्री सडक योजना भाग ३ अंतर्गत सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून २६ किलोमिटर लांबीचे चार रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी शिवसेना कार्यालयात दिली. राऊळ म्हणाले, मंजूर झालेल्या या रस्त्यांची गेली अनेक वर्षे स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. अखेर शिवसेनेच्या माध्यमातून हे रस्ते मंजूर झाले आहेत. २६ मीटर लांबीच्या मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये चार ठिकाणच्या रस्त्यांचा समावेश आहेत. यात पहिला रस्ता- इन्सुली, निगुडे, पाटील वाडी, सावंतटेंब, शिर्केवाडी एक्साईज अॉफिस ते दलीत वस्ती रस्ता, दुसरा रस्ता पारपोली, देवसू, ओवळीये, कलंबिस्त रस्ता, तिसरा।रस्ता-बांदा सटमटवाडी रस्ता, चौथा रस्ता- आजगाव तिरोडा सदानंद मठ ते शेटकर वाडी रस्ता आदी रस्त्यांचा समावेश आहे, अशी माहिती राऊळ यांनी दिली. याची पुढील कार्यवाही संबंधित विभागाकडून होणार असल्याचेही राऊळ यांनी सांगितले.