You are currently viewing “आनंद सुधा बरसे” नाट्यगीत्याच्या मैफिलीला सावंतवाडीत उस्फुर्त प्रतिसाद…

“आनंद सुधा बरसे” नाट्यगीत्याच्या मैफिलीला सावंतवाडीत उस्फुर्त प्रतिसाद…

सावंतवाडी :

 

मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या “आनंद सुधा बरसे” या नाट्यगीत्याच्या मैफिलीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. श्री सद्गुरू संगीत विद्यालय आणि सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी वसंत (भाऊ) साळगावकर, सैनिक पतसंस्थेचे सुनील राऊळ, दिनकर परब, कृष्णा राऊळ, प्रताप परब,विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटी चे बाबल डिचोलकर, सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य निलेश मेस्त्री, उत्कर्षा मेस्त्री, किशोर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात विभव विचारे,आरोही परब, आयुषी परब, श्रीया म्हालटकर, स्मिता गावडे, अंकुश आजगावकर, अथर्व नाईक यांनी संगीत “कट्यार काळजात घुसली” या नाटकातील ‘हे जगदीश सदाशिव…’ ह्या नांदीने केली त्यांनतर पूजा दळवी,मधुरा खानोलकर, चिन्मयी मेस्त्री, मानसी वझे, सिध्दी परब,वर्षा देवण- धामापूरकर, नितीन धामापूरकर, पुरुषोत्तम केळुसकर, मनीष पवार, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, केतकी सावंत यांनी एकापेक्षा एक सरस नाट्यपदे सादर करत सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या मैफिलीला ऑर्गन साथ गुरुवर्य श्री. निलेश मेस्त्री हार्मोनियम साथ कु.मंगेश मेस्त्री व तबला साथ श्री किशोर सावंत यांची लाभली, आपल्या बहारदार शैली मध्ये निवेदन श्री. संजय कात्रे यांनी केले, ध्वनीव्यवस्था श्री. हेमंत मेस्त्री-पडेलकर यांनी सांभाळली. या कार्यक्रमास विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी,पालकवर्ग व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी उपस्थीती दर्शवली व कार्यक्रमाची सांगता श्री श्रीपाद चोडणकर यांनी ‘तमनिषेचा सरला’ ही भैरवी सादर करून केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा