सावंतवाडी
सावंतवाडी दोडामार्ग उत्कर्ष मराठा समाज मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ उर्फ अण्णा परब त्यांच्या अकाली निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. आज मंडळाची तातडीची बैठक होऊन या बैठकीत नूतन अध्यक्ष म्हणून श्री परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणी येत्या आठ दिवसात निवडण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी गेल्या चौदा वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झाली होती. या मंडळाची व्याप्ती आता वाढवून लवकरच मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठा समाज बांधव आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहणार आहेत, असे नूतन अध्यक्ष परब यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे सचिव दत्ताराम सडेकर यांनी कोरोना वर मात करण्यासाठी मोफत योगा शिबिर घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संस्थेचे खजिनदार भूपेंद्र सावंत, उपाध्यक्ष सुहास सडेकर, सत्यजित धारणकर, दत्ता सावंत, अजित वारंग, पंढरी राऊळ, ॲड. संतोष सावंत, विश्वनाथ राऊळ, यशवंत आमोणेकर, विनोद सावंत, संजय सावंत, साई हवालदार, नंदकिशोर नाईक, बाळा उर्फ गणपत नमशी, सुधाकर राणे, दीनानाथ नाईक, गजानन तेजम, उज्वला सावंत, विजया रामाणे, भक्ती सावंत, महादेव दळवी, रघुनाथ धारणकर आदी उपस्थित होते. यावेळी अजित वारंग, दत्ता सावंत, विनोद सावंत, बाळा नमशी त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम घ्यावी अशी सूचना मांडली. यावेळी ॲड. संतोष सावंत म्हणाले, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हे मंडळ कार्य करीत आहे वसा आपण आता प्रत्येकाने अंगी करूया. शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या व बेरोजगार तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल यादृष्टीने प्रयत्न करूया. यासाठी या मंडळाच्या वतीने धन गट गठित करूया. सहकाराच्या माध्यमातून हे आर्थिक संस्थाही उभारण्याचा संकल्प करू. या त्यादृष्टीने तात्काळ धन गट ची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी श्री अमोनकर यांनीही या मंडळाचे एक कायमस्वरूपी समाजाला दिशा देणारे भवन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करूया असे स्पष्ट केले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त देवसू शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ यांचा सत्कार श्री परब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नूतन अध्यक्ष श्री परब यांचा सत्कार ज्येष्ठ कार्यकर्ते सडेकर यांनी केला यावेळी सूत्रसंचालन सत्यजित धारणकर तर आभार भूपेंद्र सावंत यांनी मानले.