You are currently viewing मोबाईल…!

मोबाईल…!

*साहित्यिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*

 

*मोबाईल..!*

      *एक झलक*

 

आपल्या हातात बरेच काही असते,पण ते आपण किती करतो हेच महत्त्वाचे आहे.

कारण माणूस जेव्हा साठीच्या आत असतो, तेंव्हा त्याला वाटते मी खूप काही करु शकतो, पण जेव्हा देवाने दिलेले शरीर आणि मन जेंव्हा खरोखरच थकायला लागते तेंव्हाच कळते की, आपली मनाची‌ भरारी खूप मोठी आहे , मनाचे आकाश खूप विशाल असते. स्वप्नांनाही खूप सुंदर रंग , आणि खूप पैलू असतात, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते.कारण तन,मन, आणि धन यापैकी कुणा एकाची साथ कमी पडली‌ तरी जीवनात खूप अडचणी येतात.

‌‌ सर्वच व्यक्तींना असे सामर्थ्य मिळतेच असे नाही. आता मी ही जास्तीत जास्त मोबाईल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असते, जेवढे लिखाण आपोआप उतरते तेवढ्या पेक्षा मी फक्त थोडेसेच लेखन करते. कारण डोक्यात जरी खूप असले तरी कोणी वाचेल की नाही, माहीत नाही, पण आता कलात्मकतेच्या कृती व सर्व कामे करायला वेळ पुरत नाही म्हणून जरावेळ मोबाईल मध्ये घालवते, पण एकसारखे जर ते पाहिले तर डोळ्यांना त्रास होतोच व एकसारखा विचार येतो की, आता येणार्या नवीन पिढीचे काय होणार?

‌‌मोबाईल‌ सतत त्यांच्या नजरेसमोर येतो. आई वडील कामात असतात, मुले मोबाईल पाहून गप्प बसतात, त्यामुळे आई वडिलांचे ही काम होते शिवाय त्यांना थोडा वेळ ही मिळतो. स्वतः चे काम करण्यासाठी मुलांच्या मागे मागे करावे लागत नाही व त्यांच्या वेळ ही बरा‌ जातो. घरात जर असली तर, हल्ली ‌फारशी एकत्र कुटुंब पहायला मिळत नाहीत, वयस्क‌ मंडळी‌ हल्ली नसतातच व असली तरी टीव्ही चालू असतो त्यामुळे मुलांकडे फारसे लक्ष नसते व मुलेही त्यापेक्षा टीव्ही , मोबाईल किंवा मित्रमैत्रिणी, करिअर, अभ्यास यात व्यस्त असतात. एकंदरीत विचारांची, भावनांची देवाणघेवाण थांबली आहे. मोबाईलवरुन एकमेकांचे वाढदिवस, शुभेच्छा, कौतुक साजरे केले जाईल, अगदी या कौतुकाला इतके उधाण येते‌ विचारुच नका. पण तेच पंधरावीस जण अचानक कोणाच्या घरी चार दिवस पाहुणे म्हणून रहायला गेले

तर त्यांचे कौतुकास्पद स्वागत होऊ शकेल कां? पूर्वी सारखी कुटुंब आता कोणाच्या घरी जाऊन राहू शकतील का? त्यांना मानसन्मान, आदर खरोखर मनापासून मिळेल कां?

कोणी अचानक पाहुणे गेले तर काही लोक साधी थालीपीठ,पिझ्झा वगैरे आॅर्डर करतात, कारण पाहुण्यांना व यजमानांना दोघांनाही समोरासमोर बसून एकमेकांची प्रेमाने, मायेने चौकशी करण्याइतका वेळ ही नसतो व तितकी मनात भावना नसते.

फारच क्वचित अशी एकत्र येऊन सणवार साजरी करणारी कुटुंब आहेत. त्यात दहाजण असले तर पाच जणतरी मोबाईल मधील माणसे धुंडाळत असतात, मेसेज पहात असतात,बोलत असतात. काही लोक तर आॅफिसची वेळ काढून मोबाईल बघतात. आता यात जरी कोणाचाही दोष नसला तरी,

लक्षात घ्या येणारी नवी पिढी

त्यांचा काहीही दोष नसतांना आपसुकच या तंत्रज्ञानाच्या जाळ्यात ओढली जातेय. तर

त्या मुलांना तंत्रज्ञानाचे शिक्षण

देण्याबरोबरच आपले सुविचार, सुसंस्कृती, समाजसेवा, मानवता, आदरभाव ना, प्रेम, माया, ममता, माणुसकी, आपली मातृभाषा, शुद्ध लेखन, वाचन, पाठांतर,तोंडी हिशोब, संभाषण चातुर्य , व्यवहार ज्ञान, आपले सणवार, उत्सव यांचीही माहिती द्या.

कारण अजून वीस‌ पंचवीस वर्षांनी जुनी‌पिढी कदाचित नसेल

व मग या गोंडस, हुशार नव्या पिढीला कोण शिकविणार आपली संस्कृती..?

तेंव्हा हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला तर बरे होईल.

काही‌घराण्यात हे संस्कार अजूनही आहेत पण आपल्या सर्वच समाजाला आपल्या मुलांना बुद्धी मान व सुसंस्कारी घडवायचे आहे.

 

त्यासाठी ही एक छोटीसी सावधानतेची झलक.

 

🌼🌼🌼🪷🌼🌼🌼

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

विरार

 

*संवाद मिडिया*

 

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

 

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

 

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

 

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

 

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

 

*सुविधा :*

 

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

 

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

 

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

 

▪️भूकंपरोधक बांधकाम

 

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

 

▪️आकर्षक लॉबी

 

▪️लिफ्टची सोय

 

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

 

▪️पाण्याची 24 तास सोय

 

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

 

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

 

▪️अंतर्गत भुयारी गटारे

 

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

 

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

 

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

 

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

 

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

 

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

 

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

 

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा