You are currently viewing जागतिक मृदा दिना निमित्त माणगाव राधाकृष्ण हॉल येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

जागतिक मृदा दिना निमित्त माणगाव राधाकृष्ण हॉल येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन माणगाव राधा कृष्ण हॉल येथे साजरा करण्यात आला यावेळी माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना शेतकरी प्रशिक्षण देण्यात आले गावातील जमिनीची सुपीकता, निर्देशांकानुसार द्यावयाची खते, पीक लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती, जमीनीची चाचपणी करून घ्यावयाची काळजी, पिकासाठी लागणारे योग्य खत, पाणी, देखरेख, पिकाची घ्यावयाची काळजी याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले, तसेच पिकाचे अधिक उत्पादन वाढविण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी रासायनिक खता बरोबर शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, त्यांच्यासोबत ताक धैचा, गिरीपुष्प या हिरवळीच्या खतांचा तसेच जैविक खतांचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण देण्यात आले

यावेळी तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे डॉक्टर धामापूरकर कृषी विज्ञान केंद्र किर्लोस, उद्यानविद्या कॉलेजचे मुळदे डॉ पळसांडे डॉ गीरीश उईके, मंडळ कृषी अधिकारी माणगाव मोहिनी वाळेकर, कृषी पर्यवेक्षक रत्नदीप कावले, के आर सी एफ चे श्रीकृष्ण वराडकर, इपको टोकियो चे सिद्धेश एडवे कृषी सहाय्यक प्रशांत कुडतरकर कृषी सहाय्यक अॅन्तोनी डिसोजा, पंकज बावीसकर, जागृती शेटवे उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा