*सुप्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ प्रा.रुपेश पाटील गोपुरी आश्रम येथे सन्मानित*
सावंतवाडी :
येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ प्रा. रुपेश पाटील यांना कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम वागदे तालुका कणकवली आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग आयोजित कोकण गांधी पूज्यनीय आप्पासाहेब पटवर्धन यांचा 129 वा जयंती उत्सव गोपुरी आश्रम येथे संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजात सातत्याने विधायक कार्य केले म्हणून तसेच युवकांना योग्य दिशा साठी प्रेरणादायी व्याख्यानातून प्रबोधन केले याबद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्रा. रुपेश पाटील यांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व गुरापुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कणकवली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रोटरी क्लबचे सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुडतरकर, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. संजीव लिंगवत (वेंगुर्ला), विजय कालिदास सावंत (उपाध्यक्ष गोपुरी), ईर्शाद शेख (वेंगुर्ला), पत्रकार महेश सरनाईक, अर्पिता मुंबरकर, ॲड. मनीषा पाटील (संचालक – गोपुरी), अमोल भोगले (खजिनदार – गोपुरी आश्रम) मंगेश नेवगे (सचिव – गोपुरी), विजय चौकेकर (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती), स्मिता नलावडे, माया रहाटे (सावंतवाडी), शितल मांजरेकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री (संचालक – गोपुरी) आदि उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*