You are currently viewing भंडारी समाज बांधवांनी महान योद्ध्याला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज व्हावे – नवीनचंद्र बांदिवडेकर

भंडारी समाज बांधवांनी महान योद्ध्याला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज व्हावे – नवीनचंद्र बांदिवडेकर

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

भंडारी समाज बांधवांनी महान योद्ध्याला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज व्हावे – नवीनचंद्र बांदिवडेकर

मालवण

स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख अपराजित योद्धा हे मायनाक भंडारी होते. येत्या ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथे नौदल दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याचे पहिले आरमारप्रमुख असलेल्या मायनाक भंडारी यांच्या कार्याची माहिती केंद्र, राज्य शासनास नसल्याने त्याची जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे भंडारी समाज बांधवांनी आतापासूनच आपल्या या महान योद्ध्याला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी येथे बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ पदाधिकारी कार्यकारणी सदस्य व येथील भंडारी समाज बांधव यांची तातडीची सभा भरड येथील हॉटेल लीलांजली सभागृह येथे झाली. यावेळी राजू आंबेरकर, रवी तळाशीलकर, यतीन खोत, विनोद चव्हाण, गणेश तळेकर, हेमंत करंगुटकर,मोहन वराडकर, सचिन आरोलकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, विजय कांबळी, गोविंद सोन्सुरकर, प्रमोद करलकर, गणपत गोलतकर, भिकाजी दुधवडकर, मोहन गवंडे, उमेश सातार्डेकर, प्रदीप मुणगेकर, सुनील बिर्जे, तुकाराम करंगुटकर, प्रकाश कांबळी, जगदीश आचरेकर, प्रवीण आचरेकर, अजित पाटकर, प्रदीप आवळेगावकर यांच्यासह अन्य समाज बांधव उपस्थित होते.

श्री. बांदिवडेकर म्हणाले, येत्या ४ डिसेंबरला किल्ले सिंधुदुर्ग येथे नौदल दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख असलेल्या मायनाक भंडारी यांच्या कार्याचीही दखल घेतली जावी यासाठी शासनाचे, नौदल विभागाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने भंडारी समाज बांधवांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मायनाक भंडारी यांचे कार्य सर्वांसमोर आणणे गरजेचे आहे. यासाठी विविध उपक्रम राबवून मायनाक भंडारी यांच्या कार्याची दखल शासनास घेण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विविध उपक्रम समाज बांधवांनी राबवून या अपराजित महान योद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही श्री. बांदिवडेकर यांनी केले.

यावेळी विनोद चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन करून सचिन आरोलकर यांनी आभार मानले.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा