बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांची माहिती
सावंतवाडी
महाराष्ट्र राज्यातील बृहन्मुंबई वगळता सर्व महानगरपालिका, नगरपालिका नगरपरिषदा, प्रादेशिक नियोजन प्राधिकरण यासाठी अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या नियमावली ऐवजी एक समान बांधकाम नियमावलीला महाराष्ट्र शासनाने २ डिसेंबर २०२० रोजी मान्यता दिली असून याच दिवशी शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे २ डिसेंबर पासून ही नियमावली लागू झाली असून याचा लाभ महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका, ३९२ नगरपरिषदा ४२७ गावे आणि अट्ठावीस हजार ग्रामपंचायतीना होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात टी – १ ते टी -५ हे झोन कायम रहाणार असून नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्र वगळता १६ मिटर उंचीपर्यंत मर्यादा असणार आहेत. तर टी-४ आणि टी -५ झोनमध्ये मोठा भूखंड आणि कमी बांधकाम हे सुत्र कायम रहाणार आहे. या नियमावली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला लागू होतील की नाही याबाबत प्रश्न चिन्ह आहे, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक तथा सावंतवाडीतील घरकुल कन्स्ट्रक्शनचे मालक डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली आहे.
एकच विकास नियंत्रण नियमावलीची सूचना ८ मार्च २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने काढली होती. सर्व महाराष्ट्राला एकच त्यामुळे त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश होता. ही मंजूरीची प्रक्रिया सुरु असतानाच सिंधुदुर्ग जिल्हासाठी कालबाहा वेगळ्या नियमावलीचे अस्तित्व शिल्लक ठेवण्यासाठी ११ फेब्रुवारी २०२० रोजी आणखी एक सूचना महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली आहे.या सुचनेला महाराष्ट्रातून एकमेव हरकत घेतलेली असून याची सुनावणी कोकण विभागाचे नगररचना सहसंचालक यांच्या कार्यालयात २३ सप्टेंबर २०२० रोजी झालेली असून त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. हा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.