You are currently viewing कोकण इतिहास परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

कोकण इतिहास परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

*कोकण इतिहास परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर*

अध्यक्षपदी डॉ.भास्कर, सचिवपदी प्रा.पाटील, उपाध्यक्षपदी डॉ.ताडेराव व खजिनदारपदी प्रा.सिरसाठे यांची निवड.

वैभववाडी
दि.३१/१०/२०२३

कोकण इतिहास परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
उपाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आँनलाईन बैठकीत जाहीर झालेल्या कार्यकारिणीत कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.व्ही.जी. भास्कर यांची अध्यक्षपदी तर आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन. पाटील यांची सचिवपदी निवड झाली आहे.
उपाध्यक्षपदी फोंडाघाट येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.राज ताडेराव यांची तर खजिनदारपदी देवगड येथील स.ह. केळकर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत सिरसाठे यांची निवड झाली आहे.
तर सदस्यपदी
डॉ.व्ही.ए. देऊलकर,वेंगुर्ला,
डॉ.सोमनाथ कदम,कणकवली,
श्री.प्रविण पारकर, मालवण,
श्री.मधुकर घाडीगांवकर, कुडाळ, श्री. विजय मांडे, कसाल,
प्रा.विनायक जमदाडे,कासार्डे यांची निवड झाली आहे.
कोकणच्या इतिहासाला एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने २०१० मध्ये कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेची जिल्हा शाखा गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहे. जिल्हा शाखेचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ नारकर यांच्या दुःखद निधनानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला कै.प्रकाश भाऊ नारकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विविध विषयांवर चर्चा होऊन जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. कै.नारकर यांचे अपूर्ण कार्य सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करणार असल्याचे नूतन अध्यक्ष डॉ. व्ही. जी.भास्कर यांनी सांगितले.
कोकण इतिहास परिषदेच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, कार्याध्यक्षा डॉ. विद्या प्रभू यांनी अभिनंदन केले आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा