You are currently viewing देवगडातील “बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम” शिबिरास मोठा प्रतिसाद

देवगडातील “बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम” शिबिरास मोठा प्रतिसाद

देवगडातील “बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम” शिबिरास मोठा प्रतिसाद

देवगड

येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल मध्ये पार पडलेल्या “बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम” शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील ११८ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा देवगड च्या वतीने या शिबिराचे आयोजन केले होते. मुख्य तंत्रज्ञ सुरज थोटम यांच्या मार्गदर्शनाखाली पौर्णिमा भडसाळे, रश्मी जाधव यांनी संपूर्ण वेळ देत चोख काम पार पाडले.

यावेळी सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे जिल्हा सचिव किशोर नाचलोणकर यांनी भेट दिली व मनोगत व्यक्त करताना “बाॅम्बे ब्लड ग्रुप” विषयी थोडक्यात माहिती दिली. जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आचरेकर, जिल्हा सहसचिव रविकांत चांदोस्कर , जिल्हा सल्लागार उद्धव गोरे, विजयकुमार जोशी, महेश शिरोडकर, ह्यूमन राईटस अंबेसिडरचे अध्यक्ष दयानंद तेली आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा