समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त खास आयोजन; उपक्रमाचा शुभारंभ आ.नितेश राणे हस्ते
कणकवली :
समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त यावर्षी “दिवाळी बाजार” ६ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत भरविण्यात येणार आहे. या बाजाराच्या माध्यमातून कुंभार समाजातील लोक मातीची भांडी,आकाश कंदील,पणत्या यांच्या मालाची विक्री होणार आहे. तसेच कणकवली शहरातील महिला बचतगटांना माल विक्रीसाठी व्यासपीठ मिळवून देण्यात येणार आहे. या दिवाळी बाजार उपक्रमाचा शुभारंभ आ.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.
कणकवली येथील भाजपा शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अभिजित मुसळे, राजा पाटकर, जावेद शेख, पंकज पेडणेकर, सागर बावर्डेकर, लवराज झेमने आदी उपस्थित होते.
दिवाळी निमित्त यावर्षी समीर नलावडे मित्रमंडळच्या वतीने या बाजाराच्या माध्यमातून कुंभार समाजातील लोक मातीची भांडी,आकाश कंदील,पणत्या यांच्या मालाची विक्री होणार आहे.शहरातील बचतगट महिला क्या फराळ,रांगोळी ,डिझाईन साठी स्टॉल मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.१० स्टॉल कुंभार समाजातील लोकांना देण्यात येणार आहे.उर्वरित स्टॉल महिला बचतगटांना ६ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत हा उपक्रम असणार आहे.गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद लाभला आहे.महिला स्वतःच्या हाताने तयार केलेला माल विकला जाणार आहे.सर्वांना मोफत स्टॉल दिला जाणार आहे,लाईट व्यवस्था केली जाणार आहे.कुंभार समाजातील लोकांकडून मातीची भांडी बनविताना लाईव्ह दाखवला जाणार आहे.या स्टॉल ची नोंदणी ३२ स्टॉल दिले जाणार आहेत, त्यासाठी जावेद शेख,अण्णा कोदे,राजा पाटकर यांचेकडे नोंदणी करावी,असे आवाहन समीर नलावडे यांनी केले.