You are currently viewing कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांचे दिव्यांगांनी मानले आभार…

कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांचे दिव्यांगांनी मानले आभार…

कणकवली :

 

मागील अनेक दिवस दिव्यांगांच्या समस्या वाढत असल्याने एकता दिव्यांग विकास संस्थेच्या माध्यमातून कणकवली तहसीलदार यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते. तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी काही दिवसांत आपण बैठक घेऊन शक्य तेवढ्या शासन स्तरावरील समस्यांचे निरसन करू असे आश्वासन दिले होते. तहसीलदार श्री. देशपांडे यांनी दिलेल्या आश्वासनांचा शब्द पाळला व शासन स्तरावरील अधिकऱ्यांशी चर्चा करू त्यावर योग्य तो निर्णय घेऊन समस्यांचे निरसन केले. त्यामुळे सोमवारी एकता दिव्यांग विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

यावेळी संस्थाध्यक्ष म्हणाले की, तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्यासारखा अधिकारी आम्हाला मिळणे हे आमचं भाग्य समजतो. दिव्यांगांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवणारा अधिकारी आम्ही आजवर पाहिलाही नाही असे ते म्हणाले. आरटीओ, रेल्वे, जिल्हा परिषद, हॉस्पिटलसह अन्य ठिकाणी काहीशा समस्या जाणवत होत्या मात्र त्यांचे योग्य प्रकारे निरसन करून त्यातून आम्हाला मार्गही त्यांनी काढून दिला असल्याचे श्री. सावंत म्हणाले.

तर यावेळी तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी दिव्यांगांना ज्या -ज्या वेळी शासन स्तरावील ज्या काही अडचणी भासतील त्या अवश्य सांगा त्या योग्य प्रकारे मार्गी लावल्या जातील असेही ते म्हणाले.

यावेळी संस्थाध्यक्ष सुनील सावंत, उपाध्यक्ष संजय वारंगे, सचिव सचिन सादये, बाळकृष्ण बावकर, यल्लपा कट्टीमणी, श्री. राणे, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी – सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा