You are currently viewing कणकवली जवळील सांगवे येथे पोलिसांचा जुगाऱ्यांना दणका

कणकवली जवळील सांगवे येथे पोलिसांचा जुगाऱ्यांना दणका

*कणकवली जवळील सांगवे येथे पोलिसांचा जुगाऱ्यांना दणका*

*संवाद मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट*

कणकवली जवळील सांगवे, हळवल, कसवण आदी भागातील माळरानावर गेले बरेच दिवस जुगाराच्या मैफिली सजत असल्याचे सूत्रांकडून खात्रीलायक वृत्त संवाद मीडियाकडे प्राप्त झाले होते. जुगारासारख्या अवैध्य धंद्यांवर कारवाई होण्यासाठी संवाद मीडिया नेहमीच आवाज उठवत असतो. अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आदेश दिल्याने कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी मध्यरात्रीनंतर सांगवे येथे छापा टाकून जुगार खेळत असलेल्या जुगारऱ्यांना पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान ताब्यात घेतले. यात २५ हजार रोख आणि मुद्देमाल हस्तगत केला. जुगार खेळत असताना ताब्यात घेतलेल्या सिद्धेश मोरजकर, सुजित बाईत, निलेश हेरेकर, संदीप वंडकर, राजेश परब इत्यादींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली जवळील हळवल, कसवण, सांगवे येथील माळावर जागा बदलून गेले काही दिवस रात्रीच्या वेळी जुगार सुरू असल्याची खबर समोर येत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे मोठे मोठे जुगार चालवले जातात यात तक्षिमदार कोणी वेगळे नसतात तर तेच तेच तक्षिमदार प्रत्येक ठिकाणी भागीदारीमध्ये मोठ मोठे जुगारी जुगाराचे फड उभे करतात आणि त्या भागाची जबाबदारी असलेल्या खाकी वर्दीच्या एखाद्या शिलेदाराला हाताशी धरून मैफिली सजवतात. यामुळे अनेक गावांमधील तरुणवर्ग जुगाराच्या नादात बरबाद होत चालला आहे. कित्येकांचे संसार जुगारामुळे उध्वस्त होत आहेत, काहींना राहते घरदार विकून बेघर होण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. परंतु एकदा का जुगारासारख्या खेळाची आणि पैशांची चट लागली की जुगारी खेळी स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र देखील गहाण ठेवून जुगारात नशीब आजमावत सर्वस्व हरून बसतात.
कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी अवैध्य धंद्यांवर कारवाई करून पाळेमुळे उखडून टाकणार असल्याचे सांगत अवैध्य धंद्याची माहिती मिळाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा