You are currently viewing अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आयोजित भव्य तालुकास्तरीय कथाकथन थाटात संपन्न

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आयोजित भव्य तालुकास्तरीय कथाकथन थाटात संपन्न

*सक्षम पांगम, ओजस्वी साळुंखे, रोशन साळुंखे प्रथम.*

 

मालवण / आचरा :

 

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे यांचा तालुकास्तरीय कथाकथन महोत्सव आचरे येथे कथामित्र मारुती आचरेकर कथानगरीत आज २९ ऑक्टोंबर २०२३ संपन्न झाला. सदर कथाकथन महोत्सवात मालवण तालुक्यातील शाळास्तर, केंद्रस्तर आदी स्पर्धा जिंकून ६५ स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. त्याचा निकाल खालील प्रमाणे –

*गट १) ३री/४थी – शिवरायांच्या मावळ्यांच्या कथा*

*प्रथम क्रमांक -* सक्षम संदीप पांगम (आचरे नं.१)

*द्वितीय क्रमांक -* प्रांजल सतीश तेरसे (टोपीवाला प्राथमिक)

*तृतीय क्रमांक -* श्रेयश राजेंद्र चौधरी (चिंदर कुंभारवाडी)

*उत्तेजनार्थ १)* जान्हवी आनंद परब (भगवंतगड)

*उत्तेजनार्थ २)* स्पृहा संदीप भोवर (भंडारी प्राथमिक)

 

*गट २) ५वी/६वी – गुरु शिष्यांच्या कथा*

*प्रथम क्रमांक -* ओजस्वी कैलास साळुंखे (टोपीवाला हायस्कूल मालवण)

*द्वितीय क्रमांक -* नुर्वी गिरीश शेडगे (न्यू इंग्लिश स्कूल आचरा)

*तृतीय क्रमांक -* दुर्वा प्रसाद परब (मसुरे देऊळवाडा)

*उत्तेजनार्थ १)* भाग्यश्री विलास हडकर (हडी नं.२)

*उत्तेजनार्थ २)* स्वरा नित्यानंद तळवडकर (आचरे पिरावाडी)

 

*गट ३) ७वी/८वी – महिला शास्त्रज्ञांच्या कथा*

*प्रथम क्रमांक -* रोशन कैलास साळुंखे (टोपीवाला हायस्कूल मालवण)

*द्वितीय क्रमांक -* यज्ञेश राजेश गोलतकर (तोंडवळी वरची)

*तृतीय क्रमांक -* किंजल आनंद परब (भगवंतगड)

*उत्तेजनार्थ १)* यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (मसुरे देऊळवाडा)

*उत्तेजनार्थ २)* दिव्या नितीन गावकर (इंग्लिश मीडियम स्कूल, आचरा)

 

या स्पर्धेसाठी गट क्र. १ मध्ये रामचंद्र कुबल, भावना मुणगेकर, श्रावणी प्रभू, तेजल ताम्हणकर, सायली परब, गट क्रं.२ मध्ये नवनाथ भोळे, अमृता मांजरेकर, अनिरुद्ध आचरेकर, निसार सोलकर, अमोल खेडकर, संजय परब, गट क्र.३ मध्ये परशुराम गुरव, नितीन प्रभू, महादेव बागडे, मधुरा माणगावकर, रामकृष्ण रेवडेकर यांनी संयोजन व परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.

यशस्वी विद्यार्थ्यांना कथामाला मालवणच्या वतीने व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरेच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल ऑफिसर श्री. आनंदराव डिंगणकर यांनी प्रायोजित केलेली रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व ६५ स्पर्धकांना कै.सौ. सुमेधा कांबळी चॅरिटेबल ट्रस्ट, रेवंडी मालवण यांच्याकडून साधना दिवाळी अंक भेट देण्यात आला.

*शुभारंभाचा रंगला सोहळा-* शुभारंभ सोहळा श्री. लक्ष्मण आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवसाय विकास अधिकारी श्री. कृष्णा दिल्लेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी व्यासपीठावर श्री. संजोग कुंभार, सुगंधा गुरव, चंद्रकांत माने, तुकाराम पडवळ, सुधीर धुरी, संदीप पांगम उपस्थित होते. यावेळी बोलताना दिल्लेवार म्हणाले, *”तळमळीने काम करणारे कथामालेचे प्राथमिक शिक्षक पूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत आहेत. अशी नियोजित व उत्कृष्ट स्पर्धा पाहण्याचा हा योग मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो.”*

अध्यक्ष स्थानावरून बोलताना वैभवशाली पतसंस्था आचरेचे ज्येष्ठ संचालक श्री. लक्ष्मणराव आचरेकर म्हणाले, *”गेली १४ वर्षे या स्पर्धेचे आयोजन मी पाहत आहे. सुंदर नियोजनामुळे या स्पर्धेचा वेलू गगनावरी गेला आहे. याचे श्रेय कथामालेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे.”*

या कार्यक्रमाचे औचित्य साधून कथामाला सदस्य गुरुनाथ ताम्हणकर यांचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अध्यक्ष सुरेश ठाकूर, तात्या भिसळे, अशोक कांबळी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पालक व मार्गदर्शक शिक्षक यांना कथामाला सदस्य श्री. रामचंद्र कुबल यांनी लिहिलेल्या झुल्बी१, झुल्बी२, माली, टाईम प्लीज या लघुपटांचे चित्रीकरण श्री चंद्रकांत माने यांनी प्रोजेक्टर द्वारे दाखविले.

समारोपाचा कार्यक्रम कथामाला सल्लागार सदानंद कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रकाश पेडणेकर, चंद्रशेखर हडप, भानुदास तळगावकर, सुरेखा सामंत (माता पालक संघ, आचरे नं. १), श्रावणी प्रभू, योगिता कदम, सायली पाटील, मनाली फाटक, प्रविण पारकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चंद्रशेखर हडप यांनी कथाकथन व प्रेक्षकांच्या वतीने श्रावणी प्रभू यांनी मार्गदर्शन केले. कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले तर पांडुरंग कोचरेकर यांनी कथामालेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा