*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शरच्चंद्र*
शरच्चंद्रा गंध रातराणीचा
अंधार हरवला यामिनीचा
हसे तारकापुंज अंबरीचा
हर्ष वर्णावा कैसा अवनीचा
मेघकुंभ हे चंद्रकिरणांचे
शिंपण शीत अमृतकणांचे
आगमन शिव-उमा-गणांचे
खेळायास खेळ जागरणांचे
केशरी आटीव दूधाचे पातेले
औषधी चंद्रप्रकाशाची झेले
ज्येष्ठापत्याचे औक्षवण केले
सौहार्दे दिले भरलेले पेले
ग्रहणग्रस्त आजचा चांदवा
कुंद हवेत जरासा गारवा
अंगा खेटता,स्पर्श हवा-हवा
जसा तुझ्या प्रितीतला गोडवा
विजया केळकर________
नागपूर
*संवाद मीडिया*
*☘️ ही दिवाळी साजरी करा सुरक्षित ह्युंदाई कार्स सोबत…!!*
● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗
*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙*
💁♂️त्वरित एक्स्चेंज
💁♂️लोन सुविधा उपलब्ध
*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे
📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*
📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*