निवडणूक मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम जाहीर!
1 जाने 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्याला मतदार नोंदणी करता येणार!
१० नोव्हें. पर्यंत विशेष ग्रामसभा; सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे.
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 69 598 एवढे मतदार असून 9 डिसेंबर 2023 पर्यंत मतदार नोंदणी दुरुस्ती व वगळणे यासाठी विशेष मतदान नोंदणी कार्यक्रम निवडणूक विभागाकडून राबविल्या जात आहे. 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवं मतदाराला मतदार नोंदणी करता येणार असून नव मतदार नवीन नोंदणी तसेच सर्व मतदारानी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असल्याबाबत खात्री करून घ्यावी व दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री किशोर तावडे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी सिंधुदुर्ग चे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड हे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव मतदारांचे प्रमाण हे जास्त असून 18 ते 19 वयोगटातील लोकसंख्या प्रमाण 3.44% आहे. मात्र यातील 1.05 टक्के मतदाराने नोंदणी केली आहे. या वयोगटातील नव मतदारानी आपले मतदार नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारींनी केले आहे. 1 जानेवारी 2024 या अर्थ दिनांकावर मतदार यादी निश्चित होणार असून या दिवशी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला आपले मतदार नोंदणी करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे नवं मतदाराने आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी. ऑनलाइन किंवा ऑफलाइन ही मतदान नोंदणी करता येईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
विशेष ग्रामसभेचे आयोजन
नव मतदार नोंदणी नव्याने लग्न होऊन आलेल्या स्त्रिया, कायमस्वरूपी वास्तव्यास आलेले नागरिक, स्थलांतरित व्यक्ती अशा स्वरूपातील मतदान नोंदणी मधील दुरुस्त्या, नाव व मतदार संघातील बदल अशा स्वरूपातील दुरुस्त्या या काळात होणार असून त्यासाठी प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2023 या काळात विशेष ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन होणार असून मयत अथवा बाहेरगावी गेलेल्या मतदारांची नाव नोंदणी वगळणे, मतदारांचे दुरुस्ती व मतदार यादीत नाव नसल्यास नवीन नाव दाखल करणे याबाबतचे पूर्णनिरीक्षण कार्यक्रम या ग्रामसभेत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ग्रामसभेत सहभाग घेऊन आपल्या मतदार यादीतील नावाची व तपशिलाची खात्री करावी व त्यात दुरुस्तीची गरज असेल तर करून घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
सद्या सहा लाख 69 हजार 598 मतदार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 जानेवारी 2023 च्या अंतिम यादीनुसार जिल्ह्यात एकूण सहा लाख 69 हजार 598 एवढे मतदार आहेत. त्यात तीन लाख 33 हजार 987 पुरुष मतदार व तीन लाख 35 हजार 611 स्त्री मतदार एवढे मतदार आहेत. पुरुषांच्या तुलने स्त्री मतदार जास्त असून गुणोत्तर प्रमाण 1005 इतका आहे.
27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर विशेष मोहीम
निवडणूक विभागाने 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या काळात ही विशेष मोहीम राबविली असून नव मतदार तसेच दुरुस्ती असलेल्या मतदारानी या काळात खात्री करून घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*
*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*
*🤷🏻♀️🤷🏻♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻♀️🤷🏻♀️*
✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️
❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*
🌇 *BEST OFFER* 🌇
✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*
✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*
✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*
🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅
🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*
📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*
*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*
🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*
*📱8799978651*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*