*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम रचना*
*अजून संसार सुरु झालाच नव्हता !*
तिनं मला पाहिलं…..मी ही तिला पाहिलं
आम्ही एकमेकांजवळ आलो…एकदा नाही , बर्याचदा आलो
हाॅटेलचे लुसलुशीत , खमंग , लज्जतदार पदार्थ खाता खाता गप्पा ही मनसोक्त रंगल्या…
ती मला सौंदर्याची यामिनी भासली !
मी ही तिला उपभोगाचा ययाती जाणवलो !
मी तिला तिच्या अप्सरकांती यौवनासह आकंठ प्राशनाचे आश्वासन दिले….
तिने ही मला तृप्ततेच्या मधाळ सागरात नखशिखांत बुडवायचे मनी योजिले….
*पण अजून संसार सुरु झाला नव्हता !*
आम्ही जसे भेटलो तसे
आमचे आईबाबा ही एकमेकांना भेटले
आमचे लग्न ठरले…माणसे जमली
आम्ही दोघं मंगलाक्षताशिर्वादांच्या छायेखाली सुखावलो
मी कमवत राहिलो पूर्वेला अन् ती ही कमवत राहिली पश्चिमेला….
कपाळाच्या आठ्यांवर बाहूंची वेलांटी क्वचितच पडायची……
*खरं तर अजून संसार सुरु झालाच नव्हता !….*
नंतर मुलं झाली , ती मोठी झाली , त्यांची शिक्षणं झाली , लग्न ही झाली …..
दरम्यान आम्ही निवृत्त झालो…..
” वेळ नाही ” असं रडण्यासाठी आता वेळच नव्हता !…..,
कारण वेळच वेळ होता !
*पण संसार अजून सुरु झालाच नव्हता !……*
मुलांना मुलं झाली…. आम्ही नातू पणतूंचे धनी झालो….
स्वर्णफुले उधळत होती पण आम्ही थकलो होतो
शिक्षण…पद…पैसा…मान…माणसं
सारं सारं मिळवून आम्ही
थकून एका कोपर्यात निवांत होतो…..
*तरी ही अजून संसार सुरु झालाच नव्हता !……*
कोपर्यात बसून पुन्हा अनिमेष नेत्रांनी एकमेकांकडे पहात बसलो…..
पण तेंव्हा तृप्ततेचं आश्चर्य आणि अतृप्तीचं प्रश्नचिन्ह असं दोघं ही चेहेर्यावर विलसत होतं !…..
आम्ही किती रिती पाळल्या , किती रिवाज सांभाळले !?
किती परंपरा जपल्या !? किती रुढी जाणल्या !?
किती पांग फेडले माझ्या ओजस्वी तेजस्वी दैदिप्यमान संस्कृतीचे !?
अर्थ आणि कामाच्या परिवाराला धर्म आणि मोक्षाचं कोंदण लाभल्याशिवाय कुटुंबाचं कुटुंबपण रहात नाही , घराचं घरपण रहात नाही हे कधी कळलंच नाही !?
गृहाची चौकट काय !? गेहाचा उंबरठा काय !? समाजाचं देणं काय !? भूमातेचं देणं काय !? देशाचं अन् देवाचं दान काय !?
आम्ही अभ्यास काय केला आणि पुढील पिढीस वारसा काय दिला !?
अधिभौतिकतेच्या चमचमत्या लखलखत्या झगमगत्या दास्यत्विक शूद्रतेतून अध्यात्मिकतेच्या चंदनचर्चित कस्तुरगंधित गाभार्यातील दैवीसद्गुण रत्नांकित स्वर्णसिंहासनाधिस्थ ब्राह्मणत्वापर्यंत पोहोचून ” अहं ब्रह्मास्मि ” चा मंत्र हृदयात साठवण्याला संसार म्हणतात !? हे कधी कळलेच नाही !!!!!
आम्ही जगलो फक्त ” आहार निद्रा भय मैथुनास्तव ”
आणि रमलो फक्त ” दांभिकतेला धर्म म्हणत आणि धर्माला दांभिकता म्हणत !!?? ”
आयुष्याची सकाळ दुपार संध्याकाळ संपून पैलतीराला नाव लागली
तेंव्हा खरंच कळलं होतं की…
*संसार अजून सुरु झालाच नव्हता !!!*
आणि आम्ही …..
आणि आम्ही संसार न करताच जग सोडणार होतो….
सामान्यासारखं , जनावरासारखं………
🙏🙏🌷🌷
कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
नाथसदन , ब्राह्मणगल्ली , पिंपळनेर .
ताो.साक्री , जि.धुळे 424306
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
*संवाद मिडिया*
*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*
*Advt Link👇*
————————————————–
💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*
🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*
💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*
▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर
▪️चैन स्वा
▪️बॅटरी पंप
▪️वॉटर पंप
▪️पॉवर स्प्रेअर्स
👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥
👉 आजच भेट द्या…🚶♂️
👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*
🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*
📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*