You are currently viewing ओरोस येथे परब मराठा समाज ज्ञाती बांधवांचे नवीन कार्यालयाचे उद्घाटन

ओरोस येथे परब मराठा समाज ज्ञाती बांधवांचे नवीन कार्यालयाचे उद्घाटन

ओरोस :

 

परब मराठा समाज मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा संलग्न कार्यालयाचे विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर ओरोस रवळनाथ मंदिर समोरील पद्माकर परब यांच्या घरी मुंबईचे संस्था अध्यक्ष जी एस परब यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन झाले. कै.परब गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई संस्था अध्यक्ष जी एस परब यांसमवेत सिंधुदुर्ग संघटक अध्यक्ष विनायक परब, बाळकृष्ण परब, महादेव परब,परशुराम परब, राजन परब, सुहास परब, महादेव परब, शुभम परब, सुशील परब, मारुती परब, पद्माकर परब, विनोद परब, आदींसह सिंधुदुर्ग- मुंबई येथील परब बांधव, तसेच महिला भगिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

या उद्घाटन कार्यक्रमात जी एस परब यांनी “मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाला व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. आपण गावचे मानकरी असलो तरी विखुरलेले आहोत, आपले विचार बदला व सर्वांना सोबत घेऊन चला तरच आपला समाज एकत्र येईल ही आपली भावना पाहिजे. एकत्र होऊन समाज मोठा करूया अशी संकल्पना करूया असे मनोगत व्यक्त केले.

गेल्या साठ वर्षांत परब समाजाने काय केले ते आता विसरून जायचं आहे, आता आपण नवीन संकल्पना घेऊन पुढे चालायचे असून गेल्या साठ वर्षांपूर्वी कै. परब गुरुजींनी परब ज्ञाती बांधवांची मुंबई येथे संस्था स्थापन केले. त्यांची संकल्पना, व्हिजन, दूरदृष्टी, मोठी होती. आता आपण ती चालू ठेवायला हवी. त्यांनी छोटेसे रोप लावले होते, त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. परब ज्ञाती बांधवांचा अनेक संस्था आहेत. १०० कोटींची मालमत्ता आहे. तुम्ही सभासद होणे गरजेचे आहे. तुम्ही एकत्र या शेअर्स होल्डर झालात तर त्याचे भागीदार होणार. तुम्हाला कोणतेही मदत मिळेल. आपली पतसंस्था आहे, ती मोठी करुया व परब समाज मोठा करूया. समाजाची कामे करा, तर समाजाची ताकद दिसून येईल. नेतृत्व कोणाला म्हणायचे जो समाजाला सोबत घेऊन जातो अशी आपण संकल्पना करूया असेही जी एस परब म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार महादेव परब यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा