You are currently viewing दसरा शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्स तर्फे ५१ कार्स चे वितरण

दसरा शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्स तर्फे ५१ कार्स चे वितरण

*दसरा शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्स तर्फे ५१ कार्स चे वितरण*

रत्नागिरी

देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे तर्फे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या रत्नागिरी, चिपळुण आणि कणकवली येथील शोरुम मधून एकत्रित ५१ टाटा कार्स ची डिलिव्हरी दिली. रत्नागिरी येथुन २६, चिपळूण १४ आणि कणकवली ब्रांच मधून ११ वाहनांची डिलिव्हरी करण्यात आली.
डिलीवरी वेळी ग्राहकांकरीत अल्पोपहार पेयपान सहित पारंपारीक पद्धतीने फेटा बांधुन तुतारी चे गजरात आणि सुमधुर सनई वाजनात संपुर्ण जल्लोशपूर्ण वातावरणात वाहन डिलीवरी देण्यात आली.
अल्पावधीत आपली विक्री आणि विक्री पश्चात सेवा मुळे ग्राहकांचे प्रथम पसंतीस उतरलेली आणि सर्वोत्तम रेटिंग प्राप्त केलेली एस.पी.ॲाटोहब ही कोकणातील पहिलीच डिलरशीप ठरत आहे.
संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत टाटा मोटर्सच्या वाहनांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे.
एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात,राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा द्वारे प्रवेश केला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे रत्नागिरीतील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवे करिता उपलब्ध करून दिले आहे.
डिलिव्हरी झालेल्या वाहन मध्ये टाटा टियागो टिगोर पेट्रोल आणि सी.एन.जी.
न्यू नेक्सोन पेट्रोल आणि डिझेल, पंच, अल्त्रोझ, अशा सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश होता.
लवकरच न्यू सफारी ७ सीटर आणि हॅरीअर चे लॉंचिंग आयोजित करणेत येणार आहे.
आजच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांचा बुकिंग करण्याकडे देखील कल दिसून आला. आजच्या दिवशी नवीन वाहनांचे १४ बुकिंग नोंद झाले.
नुकतीच टाटा ने अलत्रोझ ही प्रीमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये येणारी कार सी.एन.जी.मध्ये उपलब्ध करून दिली असल्याने आणि भारताची सर्वात जास्त विकली जाणारी नेक्सोंन नविन रुपात सादर केलेने सदर कार चे बुकिंग ला उत्तम प्रतिसाद मिळाला.
ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कार च्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा