ओटवणे ऐतिहासिक संस्थानकालीन दसरोउत्सवाची उत्साहात सांगता
सावंतवाडी
सुमारे साडे चारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आणि सावंतवाडी संस्थांनचे वैभव असलेल्या ओटवणे गावच्या दोन दिवसाच्या प्रसिध्द संस्थानकालीन दसरोत्सवाची सांगता हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साहात झाली. राजेशाहीचा सण अशी ख्याती असलेल्या या उत्सवात हजारो भाविकांनी सुवर्ण अलंकारांनी विभूषित रवळनाथासह सुवर्ण तरंगाच्या चरणी लीन होत या देवतांच्या कृपाशीर्वाद घेतला.
सर्व देवतांना भरजरी वस्त्रांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढवण्याची प्रथा असलेल्या या दसरोत्सवात याची देही याची डोळा या देवस्थानचे सुवर्ण वैभव पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. खंडेनवमी प्रमाणेच मंगळवारी विजयादशमीलाही भाविकांनी या दसरोत्सवाच्या सांगता सोहळ्याला गर्दी केली होती. सायंकाळी देवस्थानच्या मानकऱ्यांनी देवतांना आवाहन केल्यानंतर देवस्थानचे कुळाचा पूर्वस हे सुवर्ण तरंग देवस्थानच्या मानकऱ्यांसह सवाद्य वाऱ्याच्या गतीने तेरेखोल नदीवरील ओटवणे ब्रिज नजीक ऐतिहासिक माठ्याकडे गेले. या ठिकाणी असलेल्या सावंतवाडी संस्थानच्या पहिल्या खेम सावंतांच्या समाधीला भेट देऊन त्याच गतीने पुन्हा हे सुवर्ण तरंग रवळनाथ मंदिरकडे आले.
त्यानंतर या सुवर्ण तरंगांचा उपस्थित भाविकांना दर्शन व आशीर्वादाचा कार्यक्रम झाला. यावेळी सुवर्ण तरंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. त्यानंतर रवळनाथाच्या गाव रखवाल कौल या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने या दसरोत्सवाची सांगता झाली. दरम्यान या दसरोत्सवासाठी सावंतवाडी महसूल खात्याच्या उपकोषागारात असलेला या देवस्थानचा हा ऐतिहासिक सोनेरी ठेवा म्हणजेच रवळनाथाचे असंख्य सुवर्ण अलंकार आणि या देवस्थानची तिन्ही सुवर्ण तरंगे वर्षातून एकदाच दसरोत्सवात आणली जातात. हा सोनेरी ठेवा बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पुन्हा सावंतवाडी महसूल खात्याच्या उपकोषागारात ठेवण्यात आला.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*