– धम्मज्योती गजभिये
सिंधुदुर्गनगरी
संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा (UPSC) पूर्व परीक्षा सन 2020 उत्तीर्ण झालेल्या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एकावेळी एकरकमी रुपये 50 हजार आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षा पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरीता (UPSC) दर वर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगामार्फत नागरी पूर्व परिक्षा-2020 दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी घोषीत करण्यात आला आहे.
सन 2020 मध्ये अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परिक्षा 2020 उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरीता एकावेळी एकरकमी रु. 50 हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. बार्टी मार्फत मुख्य परीक्षेकरीता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यसाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर भेट देवून पात्रतेचे स्वरुप तपासून, अर्ज डाऊनलोड करुन व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ई-मेलवर पाठवावेत असे, आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.