You are currently viewing प्रा.सौ.सुमती पवार यांच्या”चला कापडण्याला” या क्रांतिगाथेस एकाच आठवड्यात दोन नामांकित संस्थांचे राष्ट्रीय पुरस्कार

प्रा.सौ.सुमती पवार यांच्या”चला कापडण्याला” या क्रांतिगाथेस एकाच आठवड्यात दोन नामांकित संस्थांचे राष्ट्रीय पुरस्कार

*वैशाली प्रकाशन पुणे (मा. विलास पोतदार ,नाशिक) या अग्रगण्य प्रकाशन संस्थेने केले पुस्तक प्रकाशित*

 

ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार नाशिक यांची राष्ट्रीय संत नामदेव काव्य) साहित्य पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली. प्रा.सौ.सुमती पवार, नाशिक यांना समृद्धी प्रकाशन हिंगोली व्दारा आयोजित राष्ट्रीय संत नामदेव साहित्य पुरस्कार 2023 जाहीर झाल्याचे पत्र संत नामदेव साहित्य पुरस्काराचे आयोजक प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे मराठी विभागप्रमुख शिवाजी महाविद्यालय हिंगोली यांनी दिले आहे. राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संत नामदेव साहित्य पुरस्काराचे वितरण 23 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

प्रा.सौ.सुमती पवार यांच्या “चला कापडण्याला” या ललित साहित्य प्रकारातील या कृतीला संत नामदेव साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय आदी मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेऊन राष्ट्रीय पातळीवरील नामांकित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांवर त्यांचे अभिनंदन होत आहे.

याच “ चला कापडण्याला” पुस्तकाला मागच्याच आठवड्यात” श्रीचक्रधर स्वामी वाड्.मय पुरस्कार” शेवाळा,ता. कळमनुरी या नामांकित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा