You are currently viewing ओटवणे दसरोत्सव उत्साहात

ओटवणे दसरोत्सव उत्साहात

ओटवणे दसरोत्सव उत्साहात

सावंतवाडी

ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव भाविकांच्या विक्रमी गर्दीत मान मानकरी यांच्या उपस्थित उत्साहात साजरा होत आहे. खंडेनवमी दिवशी विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर दसऱ्यादिनी होणार उत्सवाची सांगता. सोमवारी खंडेनवमी दिनी सुवर्ण तरंगे पाहून डोळ्यात साठवून घ्यावा असा सुवर्ण क्षण पाहण्याचा योग हजारो भाविकांनी प्रत्यक्षात अनुभवला. खंडेनवमी दिवशी शिवलग्न सोहळा, इंगळे नहाणे याच बरोबर नवस फेडणे बोलणे आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. रिती रिवाजानुसार अनेक कार्यक्रम विधी परंपरा पार पडल्या.घटस्थापनेदिनी सूरु झालेला हा दसरोत्सव उत्साहात पार पडला. शीवलग्न सोहळ्या बरोबरच सुवासिनींसाठीची आगळी वेगळी आणि पर्वणी असणारी नवस फेडीची परंपरा ,‘इंगुळके नहाणे’ हा नवस फेडण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. साडे चारशे वर्षापेक्षाही जास्त वर्षाची परंपरा लाभलेल्या या सोहळ्यास दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी असते. तशात किंबहुना त्याहीपेक्षा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या गर्दीत हा सोहळा पार पडला. वर्षातुन एकदाच हा क्षण अनुभवता येत असल्याने या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळत असल्याने भाविकही या सोहळ्यास मोठ्या संखेने उपस्थित होते.
सुवर्ण तरंगे पाहण्यासाठी रवळनाथ चरणी लीन होण्यासाठी हा परिसर भाविकांनी फुलून गेला होता.ग्रामस्थ तसेच भाविक आज या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भाविकाना या सोहळ्याचे साक्षीदार होता आले हा नेत्रदीपक सोहळा पाहता आला, याचे समाधान व्यक्त केले व रवळनाथचरणी नतमस्तक झाले. दसऱ्यादिवशी या उत्सवाची सांगता होत असून नवस बोलणे, नवस फेडणे, आदी धार्मिक कार्यक्रमासह तरंग काटिसह संचारपुरुष सह मानकरी ओटवणे नदी किनारी त्रिवेणी संगमावर असणाऱ्या खेमसावंत समाधीला भेट देवून पुन्हा मंदिराकडे येऊन त्यानंतर गाव कौलाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. स्थानिक देवस्थान कमिटी च्या सुयोग्य नियोजनामुळे हा कार्यक्रम उत्साहात गर्दीत पण भाविकांना कोणताही त्रास न होता पार पडतो आहे. भाविकांच्या सहकार्याबद्दल भाविकांचे स्वागत तसेच आभारही देवस्थानं कमिटीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा