You are currently viewing अविरत सेवेची 25 वर्षे…..

अविरत सेवेची 25 वर्षे…..

अविरत सेवेची 25 वर्षे…..

माई ह्युंदाईच्या असंख्य ग्राहकांना, हितचिंतकाना दसरा आणि येणाऱ्या दिवाळीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

माई ह्युंदाईला आज 25 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मागे वळून पाहतांना अनेक आठवणी नजरेसमोर तरळून जातात. एखादी कंपनी नव्याने व्यवसाय सुरू करून इतकी वर्षे जम बसवते आणि व्यवसाय वाढवते यासाठी प्रचंड कष्ट, कल्पकता, उत्तम सेवा आणि मनुष्यबळावर विश्वास लागतो, जो माई ह्युंदाईने मिळवलाय.

ज्या काळात माई ह्युंदाईची बीजं कोल्हापुरात रोवली गेली, तो काळ वेगळाच होता. भारतात आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले होते. सर्वच क्षेत्रात नवनवीन कंपन्या येऊ घातल्या होत्या. ऑटोमोबाईल क्षेत्रही याला अपवाद नव्हतं. त्यावेळेपर्यंत बाजारात जे उपलब्ध आहे, तेच ग्राहकांना वापरावं लागायचं. ठराविक कंपन्यांच्या मोनोपॉलीचे दिवस होते ते.

अशावेळी कोरियन कंपनी ह्युंदाईने भारतात प्रवेश केला. भारतातील ग्राहक चोखंदळ आणि सर्व्हिसबाबत सदैव जागृत. अशावेळी एका परदेशी कंपनीने वाहन उद्योगात भारतात पाऊल ठेवणे ही फारच मोठी गोष्ट होती. आणि ह्युंदाईसारखी नवीन कंपनी भारतातल्या रस्त्यांचा, इथल्या वाहन उद्योगाचा, ग्राहकांचा अभ्यास करून भारतात आली. अगदी सुरूवातीला भारतामध्ये ह्युंदाईने जे निवडक डिलर्स निवडले त्यामध्ये कोल्हापुरातल्या घाटगे ग्रुपचं नांव आघाडीवर होतं. याचं कारण घाटगे ग्रुपचं ट्रान्स्पोर्ट, कुरीयर या व्यवसायातलं काम, ग्रुपची विश्वासार्हता हे होतं. पंचवीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातील ह्युंदाईची अधिकृत डिलरशीप म्हणून माई ह्युंदाईमधून ह्युंदाई कार्सची विक्री सुरू झाली. अगदी सुरुवातीला महिन्याला 9 ते 10 गाड्या विकल्या जायच्या. घाटगे ग्रुपमधल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी या डिलरशीपसाठी जीवाचं रान करून वाहन उद्योगाच्या स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. माई ह्युंदाईच्या कर्मचाऱ्यांची धडपड बघून ह्युंदाई मोटर्सने कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कार्स विक्रीची व विक्री पश्चात सेवेची जबाबदारी माई ह्युंदाईला दिली. आधीपासूनच उत्तम सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या घाटगे ग्रुपचा नावलौकिक कामाला आला. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे माई ह्युंदाईच्या दहा डीलरशिप्समधून आज महिन्याला 325 ते 350 गाड्यांची विक्री होते. पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीची ह्युंदाई डीलरशिप म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रात माई ह्युंदाईला आदराचे स्थान आहे. माई ह्युंदाईच्या सर्व डीलर शीपच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांत साठ हजारांहून अधिक ग्राहकांनी विश्वासाने माई ह्युंदाईमधून कार्स खरेदी केल्या आणि विक्री पश्चात सेवेसाठी माई ह्युंदाईवरच विश्वास दाखवला. साठ हजारांहून जास्त समाधानी ग्राहकांचा माई ह्युंदाई परिवार आज पश्चिम महाराष्ट्रातला मोठा परिवार आहे. विक्रीपश्चात सेवा व ग्राहकांना समाधानकारक सेवेबद्दल माई ह्युंदाईला या काळात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अर्थात या सर्वांसाठी माई ह्युंदाईच्या कर्मचारी वर्गाने घेतलेली मेहनत सुद्धा कौतुकास्पद आहे. या काळात माई ह्युंदाईसोबत अनेक व्हेंडर्स, बँकर्स जोडले गेले. या सर्वांनी नेहमीच माई ह्युंदाईला भरभरून सहकार्य केलं. यानिमित्ताने या सर्वांना धन्यवाद देणं आवश्यक आहे.

व्यवसायाबरोबरच या परिसरात अनेक सामाजिक कामात माई ह्युंदाईने आपले योगदान दिले आहे. वृक्षारोपण असो वा महापूर, कोरोनासारखी आपत्ती असो, माई ह्युंदाईने त्यावेळची गरज ओळखून गरजवंतांना मदतीचा हात देऊ केलाय.
ह्युंदाई कार्सची क्वालिटी आणि माई ह्युंदाईची सेवा यामुळे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहक पुन:पुन्हा ह्युंदाई कार्स घेण्यासाठी माई ह्युंदाईचीच निवड करतात. एकेका कुटुंबात ह्युंदाईच्या पाच ते सहा गाड्या घेतल्या जातात. ह्युंदाई कार्सची क्वालिटी आणि माई ह्युंदाईची उत्तम ग्राहक सेवा यामुळेच ग्राहक पुनःपुन्हा ह्युंदाईकडे येतायत. या ग्राहकांना सेवा देण्यासाठी घाटगे ग्रुप सदैव कटिबद्ध आहे.

माई ह्युंदाईला पंचवीस वर्षे पूर्ण झालीत म्हणून हा थोडासा आढावा घेतला. आपणासारख्या ग्राहकांच्या पाठबळावर आणि कुशल कर्तबगार सहकाऱ्यांच्या पाठिंब्यावर माई ह्युंदाई भविष्यातली आव्हाने पेलण्यास सज्ज आहे. अजूनही खूप पल्ला गाठायचाय. यासाठी आपणां सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे.

धन्यवाद..

तेज घाटगे
मॅनेजिंग डायरेक्टर,
माई ह्युंदाई ग्रुप, कोल्हापूर..

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − three =