विविध विषयांवर मोफत वेबिनार
मुंबई
दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी विविध विषयांवर मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.
- सकाळी 10.00 वाजता डॉ. भावेश भाटिया आदर्श दिव्यांग उद्योजक यांचा प्रेरणादायी प्रवास
प्रमुख वक्ते- भावेश भाटिया
या वेबिनरचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/iFCARXwLpDo या लिंकचा वापर करावा.
- दुपारी 1.30 वाजता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार तक्रार निवारण अधिकारी यांची भूमिका याबाबत माहिती देण्याकरिता ॲड. उदय वारुंजीकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे . या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/mkGuto37nYg या लिंकचा वापर करावा, असे आवाहन दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.