*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रो. डॉ. जी.आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*
*मानवता*
दिवस जातात , महिने जातात ऋतु बदलतात, वर्ष सरते !
कुणा वाचून कुणाचं , काही अडत नाही !
“रामकृष्ण ही आले गेले
त्या वीण जग का ओस पडले”
जन पळभर म्हणती हाय हाय हाय —
सगळं खरंय! पण पण
रात्रीची भीती कुणाला सांगावी !
वेदना कश्या लपवाव्यात
ते फक्त स्त्री सांगू शकेल!
अश्या किती संसाराच्या कादंबऱ्या, अर्धवट राहिल्या त्याला गणती नाही !
उरलेली पाने कोरी असतात . कोरी ठेवावी लागतात !
हुंदका आतल्या आत किती दाबायचा ! क्षितिजावर
सूर्याची किरणे कशी पडावीत , त्यातलं रंग फिक्कट वाटत जातो .
दिवस येतील जातील, पण ते पूर्वीचे दिवस काळाच्या पडद्याआड गेले त्याच काय ?
हळद नाही म्हटल्यावर कुंकवाचा काय उपयोग
हळद कुंकू / चंद्र सूर्य
आत्मा व मन / शरीर व शारीरी
प्रत्येकच जीवन म्हणजे एक कादंबरी जी ज्याची त्यांनीच लिहली असते ! एक चित्रपट कथाच !
जगाला ती वाचता येत नाही ! तोंडावर उसन हसू आणून दुःख पदराआड करावी लागतात !
सुख दुःख कुणाला नाहीत ,
किंबहुना आयुष्याच्या झाडावरची ही दोनच फुले उमलत असावीत !
अनेक कंगोर्याचे जिवन
बस्स आपण एक प्रवासी आहोत , असेपर्यंत जीवनाचे
कडू गोड घोट पिणे ह्यालाच तर आयुष्य म्हणतात का ?
प्रवासी आहोत हे कळायला कित्येक वर्षे जावी लागतात !
हल्ली नाव तरी कुणाच्या लक्ष्यात राहते ! जग उफराट
आहे !
स्वतःच्या तोंडात तूप पडले की झाले ! जीवन बदलत आहे की माणूस ! की परिस्थिती !
माणुसकी हा एक शोभिवंत दागिना झाला आहे ! जो फक्त स्वार्थासाठी वापरला जातो ! काहीवेळा माणुसकीची नाटक पण करणारे लोक आहेतच !
गोड बोलून आपलं काम साधून घेणारी काही कमी मंडळी नाहीत !
देवांनी जन्म दिला , राहायचं , मोठं व्हायचं जीवन चरितार्थ चालवण्यासाठी दुकान थाटायचे ! माणुसकीच काय ? कुठल्या दुकानात मिळेल ! काय किंमत असेल बर त्याची !
प्रतिमा मोठी करण्यासाठी माणुसकी पण गहाण पडत चालली आहे !
माणूस प्राणी एवढा घाण कसा झाला कळत नाही ! स्वतःची शेखी मिळवण्यात पण पटाईत जात असते ! मीच शहाणा बाकी सगळे वेडे ! अस ह्यांच ह्यांनीच ठरवलेलं असत !
हल्ली ना सगळ्या बाजार पेठा उपलब्ध आहेत , पाहिजे ते मिळतच ! माणूस सुध्दा स्वताला
विकत चाललाय ! त्याचा वेळ हाच बहुमोल झाला आहे !
पूर्वीसारखी गाऱ्हाणी ऐकणारी व सांगणारी कोण नाहीत ! मनातील दुःख ओकण्यासाठी पण कोण रिकामा नाही ! हल्ली हे थोतांड वाटत , अस वाटण
कमी पणाची लक्षणे वाटू लागलेत !
मिठी मारण्यासाठी खांदा मिळत नाही ! कसले जगणे आले
मानवाच्या नशिबी ! बाजूला कोण राहतेय हे पण माहीत नसावे ! ही मानवाची शोकांतिका म्हणावी की , सुधारलेल जीवन !
सगळे दरवाजे बंद ! म्हणूनच आत एकटा असणारा माणूस मेला तरी कळत नाही ! वास सुटला की मग बघे लोक एकत्र येतात ! त्यापूर्वी पोलीस त्यांचं निस्तरतात !
एवढंच काय बाजूला चोरी झाली आहे हे वर्तमानपत्रात कळत ! मानवाची माणसांनी केलेली क्रूर चेष्टा ! जागतिक मानवता आयोग तर कारणीभूत नसावा ना ?
आपण भले आपले जग भले ! ह्या सूत्रात माणूस अडकत चालला आहे ! उगीच कश्याला
उठाठेव करावी नाहीतर अंगलट पण येत, अशी बोट चेपी भूमिका घेताना दिसतात . हल्ली लोक पक्ष्य जातपात सुध्दा बघू लागलेत ! किळसवाणा प्रकार ह्या मातीला केव्हापासून लागलाय बर !
दिवस येतो जातो , जग पुढे पुढे सरकतय ! मानवी मूल्यांचा ऱ्हास केव्हाच झालेला आहे !
प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
*संवाद मिडिया*
😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝
*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨
*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..
🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬
🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨
*सुविधा :*
▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले
▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले
▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा
▪️भूकंपरोधक बांधकाम
▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट
▪️आकर्षक लॉबी
▪️लिफ्टची सोय
▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी
▪️पाण्याची 24 तास सोय
♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*
▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा
▪️अंतर्गत भुयारी गटारे
▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬
🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563
📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com
🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in
*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*
📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827
*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*