माडयाचीवाडी नेरूर येथे ४ डिसेंबर रोजी आयोजन
कुडाळ
श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि टाटा पॉवरच्या सहेली ग्रुपकडून नवरात्रीत कोकणातील असामान्य महिलांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणाऱ्या नऊ भागांची मालिका प्रसारित करण्यात आली होती. या महिलांचा सत्कार सोहळा शुक्रवार ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिव्हाळ सेवाश्रम, माडयाचीवाडी नेरूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्या या उपाक्रमास संपूर्ण देशभरातून भरपूर प्रतिसाद मिळाला. हे भाग जगभरातून सुमारे ५१ लाख लोकांनी पाहिले. हा उपक्रम श्रेया बिर्जे,.ऋतिका पालकर, योगिता तांबे, श्रध्दा कदम, सुवर्णा वायंगणकर, आरती परब, माया श्रृंगारे, इंद्रायणी गावडे, तनुश्री गंगावणे ह्या महिलांच्या कर्तृत्वावर चित्रित झाला आहे, ह्या सर्व महिलांचा सत्कार आता पिंगुळी येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या, जिव्हाळा आश्रमात दिनांक ४ डिसेंम्बर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रतिमा नाटेकर, वैद्य सुविनय दामले, सुनील नांदोसकर, उद्योजक भाई मंत्री उपस्थित राहणार आहेत.