You are currently viewing कामाख्या शक्तीपीठ

कामाख्या शक्तीपीठ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*कामाख्या शक्तीपीठ*

 

माता सती चे वडील राजा दक्ष प्रजापती यांनी कंखल (हरिद्वार) येथे बृहस्पती सर्व नावाचा यज्ञ आयोजित केला होता. याप्रसंगी त्यांनी सर्व देवांना आमंत्रित केले होते मात्र आपली मुलगी सती आणि जावई शंकर यांना बोलाविले नाही. शिवाने नकार देऊनही देवी सती यज्ञ स्थानी उपस्थित राहिली. तिने आपल्या पित्यास भगवान शिवास आमंत्रण दिल्या विषयी जाब विचारला. मात्र राजा दक्षाने शिवा विषयी अपशब्द उच्चारले आणि त्याचा राग येऊन दुःखीत होऊन सतीने अग्नी कुंडात उडी घेतली. हे वृत्त कळताच भगवान शिव क्रोधित झाले. भगवान शिवाच्या तांडवाने संपूर्ण जग थरथरू लागले आणि इतर सर्व देवांनी हे तांडव थांबविण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना सुरू केली. हे पाहून विश्वाचे रक्षण करण्यासाठी आणि शिवाचे विवेक परत आणण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र वापरून सतीच्या निर्जीव शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर ठीक ठिकाणी पडले आणि त्यांना शक्तीपीठे म्हणून ओळखले जाऊ लागले. ही सर्व ५१ ठिकाणे पवित्र भूमी आणि तीर्थक्षेत्रे मानली जातात.

 

भारतीय उपखंडात सती मातेची ५१ शक्तीपीठे आहेत. या शक्तिपीठांमध्ये मातेचे वेगवेगळे अंग आणि तिचे दागिने दर्शविण्यात येतात. मातेशी संबंधित ही स्थाने अत्यंत पवित्र आहेत. या शक्तिपीठाच्या दर्शनासाठी लाखो भक्त येतात. मातेचे दर्शन घेतात. सतीच्या आशीर्वादाने संकट हरण होते अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे.

 

आसाम राज्यातील गुवाहाटी येथे स्थित असलेले ५१ शक्तिपीठांपैकी एक *कामाख्या* हे शक्तिपीठ अतिशय प्रसिद्ध आणि चमत्कारी आहे. *कामाख्या* हे मंदिर सर्व शक्तीपीठांचे महापीठ मानले जाते.

 

गुवाहाटी पासून दहा किलोमीटर अंतरावर *कामाख्या* देवीचे मंदिर आहे. हे शक्तीदेवता सतीचे मंदिर आहे. व आसामी लोकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. नीलाचल पर्वत श्रेणीत हे मंदिर स्थित आहे. भारतात देवींची ५१ शक्तीपीठे आहेत. यामध्ये आसाम राज्यातील कामाख्या मंदिर हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे जिथे स्त्रियांची योनी किंवा मासिक पाळी या विषयावर बोलणे ही टाळले जाते तिथे या मंदिरात देवीच्या योनीची आणि मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो. सती देवीने स्वत्याग केल्यानंतर शंकराने क्रोधित होऊन तांडवनृत्य सुरू केले. हे पाहून विष्णूने सतीच्या शरीराचे एकावन्न तुकडे केले .नीलाचल पर्वतावर सतीचा योनीभाग पडला. तिथेच आज हे कामाख्या मंदिर आहे.

 

हे कामाख्या मंदिर तीन भागात बनवले आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे. प्रत्येकाला तिथे जाण्याची परवानगी नसते. दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे. इथे दगडातून सतत पाणी येत असते. असे मानले जाते की माता तीन दिवसांसाठी रजस्वला आहे. हे तीन दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात.

 

येथे खास प्रकारचा प्रसाद मिळतो प्रसाद म्हणून भक्तांना ओले कापड दिले जाते. त्याला *अंबुबाची* कापड म्हणतात.

 

कामाख्या मंदिरात दरवर्षी अंबुवासी मेळा भरतो. या मेळ्यास कामरूपी कुंभ असेही म्हटले जाते. यावेळी कामाख्या मंदिरात योनी पूजेची परंपरा आहे. देशभरातले साधू ,मांत्रिक यात भाग घेतात तसेच नीलाचल गिरीवरच्या गुहांमध्ये साधक साधना करतात.

 

हे मंदिर पाहताना आणि ही कथा ऐकताना एक जाणवले की, स्त्रीच्या योनीला जीवनाचे प्रवेशद्वार मानले जाते. म्हणूनच सर्व सृष्टीनिर्मीतीचे केंद्रही स्त्रीलाच मानले जाते. एक प्रकारे स्त्रीचं महात्म्य या मंदिरात पूजले जाते.

 

*राधिका भांडारकर पुणे*

 

*संवाद मिडिया*

 

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

 

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

 

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

 

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

 

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

 

*सुविधा :*

 

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

 

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

 

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

 

▪️भूकंपरोधक बांधकाम

 

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

 

▪️आकर्षक लॉबी

 

▪️लिफ्टची सोय

 

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

 

▪️पाण्याची 24 तास सोय

 

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

 

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

 

▪️अंतर्गत भुयारी गटारे

 

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

 

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

 

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

 

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

 

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

 

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

 

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

 

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा