इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील काडापुरे तळ परिसरातील राजर्षी शाहू सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी लहू माने यांची तर व्हाईस चेअरमनपदी आनंदा बोलके यांची निवड करण्यात आली. हातकणंगले तालुका सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी ए.जे.मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली.
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक दत्तात्रय कुंभोजे व संचालक आप्पासाहेब शिंदे यांनी संस्थेच्या प्रगतीच्या कार्याचा आढावा घेतला.यानंतर संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीस संस्थेचे संचालक बापूसो घोरपडे ,भरमू मगदूम ,बबन शिंदे ,आनंदा ढामणे , शिवाजी शिंदे , आप्पासाहेब शिंदे , संचालिका सौ.महादेवी निडगुंदे ,सौ.संगिता चव्हाण ,तज्ञ संचालक विश्वास तोडकर , महादेव शिंदे , चिदानंद ज्वोले ,मोहन शिखरे , सेक्रेटरी सौ.बागेवाडीकर ,क्लार्क अवधूत शेंडे आदी उपस्थित होते.