You are currently viewing राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२०

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२०

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन

वैभववाडी

अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग होण्यासाठी, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीव व्हावी तसेच ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने २४ डिसेंबर या ‘राष्ट्रीय ग्राहक दिना’चे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२० चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर निबंध स्पर्धा राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैभववाडी शाखा यांच्यावतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. तीन गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे-
१)गट पहिला- इयत्ता अकरावी व बारावी-
विषय बाजारपेठेची बदलती रुपे आणि ग्राहक
शब्दमर्यादा ३०० ते ४००.

२)गट दुसरा- महाविद्यालय गट
विषय- २०१९ चा ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहक शब्दमर्यादा- ४०० ते ५००

३)गट तिसरा- खुला गट
विषय- कोरोना काळातील ग्राहकता
शब्दमर्यादा- ५०० ते ६००

स्पर्धकाने निबंध स्वच्छ अक्षरात पानाच्या एका बाजूला लिहिलेला असावा. स्पर्धकाचे संपूर्ण नाव, वर्ग, शाळा/ महाविद्यालयाचा पूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक स्वतंत्र पानावर लिहावा. निबंध दिनांक १५ डिसेंबर पर्यंत संस्थेच्या पत्त्यावर पाठवावेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.आपले निबंध ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस. एन.पाटील मु. पो. ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग 416 810 या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रा.एस.एन.पाटील (9834984411), जिल्हा संघटक श्री.एकनाथ गावडे (9689077595), व कोषाध्यक्ष श्री.संदेश तुळसणकर (9420100946) यांच्याशी संपर्क साधावा असे संस्थेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
(कृपया निबंध स्पर्धेची बातमी प्रसिद्ध करावी.)

प्रतिक्रिया व्यक्त करा