You are currently viewing मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निदर्शने*

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निदर्शने*

*मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निदर्शने*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्यामुळे, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या माध्यमातून मंत्रालय प्रवेशद्वारावर १८ ऑक्टोबर रोजी दुपारी भोजनकाळात तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये मुंबई जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये आणि रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि जोरदार घोषणा देऊन शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला.

निदर्शनांतील प्रमुख मागण्यांमध्ये, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा सन १९८१ मधील शासन निर्णय पुनर्जिवित करावा; बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती बंद करावी; खासगीकरण धोरण रद्द करावे; सर्व विभागांतील चतुर्थश्रेणीची रिक्त पदे सरळसेवेने भरावीत; अनुकंपा भरती विनाअट करावी; सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी; रुग्णालयांमधील कार्यरत बदली कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायम करावे; सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन नवीन आकृतीबंध तयार करावा; शासकीय कर्मचाऱ्यांना होत असलेल्या मारहाणीसंदर्भात संरक्षण देणाऱ्या भा.दं.वि. कलम ३५३ मध्ये बदल करु नये, आदिंचा समावेश होता.

या प्रसंगी, चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण; कार्याध्यक्ष भिकू साळुंखे; सरचिटणीस बाबाराम कदम; विभागीय उपाध्यक्ष दिनेशदादा कुचेकर; महिला उपाध्यक्ष वंदना चव्हाण; ज्येष्ठ नेते बाबा खान; मंत्रालय वर्ग-३ संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मंजुळे; वर्ग-४ चे अध्यक्ष शरद वणवे; सचिव नामदेव कदम; मंत्रालय उपाहार गृह संघटनेचे अध्यक्ष शिवाजी आव्हाड, जी.टी. रुग्णालय संघटनेचे अध्यक्ष पराग आडिवरेकर; सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे श्री. पवार ; जे. जे. रुग्णालयाचे अध्यक्ष कृष्णा रेणुसे; ज्येष्ठ नेते काशिनाथ राणे; सा.बां.वि. संघटनेचे अध्यक्ष विश्वास रणदिवे, सरचिटणीस शशिकांत सकपाळ; ज्येष्ठ नेते संकेत जोशी; राज्य कामगार विमा योजना संघटनेचे अध्यक्ष सुधाकर गायकवाड ठाणे विभाग अध्यक्ष विलास चाफे; वरळी रुग्णालयाचे बाळा सावर्डेकर; न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संघटनेचे अध्यक्ष केशव शेडगे; सचिव करण सोनावणे; वस्तू व सेवा कर विभाग ‘संघटनेचे अध्यक्ष महेश कळसकर; विधी महाविद्यालयाचे श्री. जाधव; आमदार निवासच्या महिला अधिकारी सौ. सांगळे; चतुर्थश्रेणी क्रेडीट सोसायटीचे संचालक सुधीर कोळवणकर; शशिकांत साखरकर, स्वाती वर्मा, आदि मान्यवर उपस्थित होते. महासंघ कार्यालय प्रमुख मनोहर दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणांत शासनाचा निषेध केला. आजच्या निदर्शनांची राज्य शासनाने दखल न घेतल्यास पुढील आंदोलन हे राज्यव्यापी व अधिक तीव्र करण्याचा इशारा महासंघाचे राज्य अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी या प्रसंगी दिला.

*संवाद मीडिया*

*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*

होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗

*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*

☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️

डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..

– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali

*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा