You are currently viewing या कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांची ओढ…!

या कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांची ओढ…!

*या कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांची ओढ…!*

कुडाळ

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने माणगाव ग्रामपंचायत येथे आयोजित केलेल्या सेंद्रिय शेतीपर माहिती केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेंद्रिय शेतीचे भविष्य पाहता आणि महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे वाढत असलेला कल पाहून विविध सेंद्रिय शेती पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने या माहिती केंद्राचे आयोजन करण्यात आले होते.
या माहिती केंद्रामध्ये जनावरांना कमी खर्चामध्ये पौष्टिक खाद्य म्हणून अझोला निर्मिती प्रकल्प तसेच गांडूळ खत निर्मिती, जीवामृत निर्मिती, दशपर्णी अर्क बनवण्याची प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जैविक खते, बीजामृत, पंचगव्य यासंदर्भातही माहिती देण्यात आली.
यावेळी कृषी सह्याद्री गटाचे सुबोध नलवडे, प्रतीक चेडे, श्रीकांत शिंदे, संकेत देशमुख, अथर्व नलवडे, रोशन पाटील, शिवम घरबुडे, गौरव मिसळ, यश पवार यांनी प्रदर्शित तंत्रज्ञानांची माहिती सांगितली. या माहिती केंद्रामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नारळ काढणी यंत्र, वैभव विळा, कोनोवीडर, नारळ सोलणी यंत्र, नूतन झेला आदी गोष्टी प्रदर्शनाला ठेवण्यात आल्या होत्या. तसेच संपूर्णा, आफ्रिकन टॉल, सिओ-३, पराग्रास या गवतांचे छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले होते.
या माहिती केंद्रातून कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांची ओढ दिसून आली. या सर्व कार्यक्रमात कोकण कण्याळ शेळी व कोकण कपिला गाईचे माहिती सत्र खास आकर्षण ठरले. विद्यापीठाच्या कृषी सह्याद्री गटाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला निळेली पशुपैदास केंद्र, मुळदे उद्यानविद्या महाविद्यालय, माणगाव ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.

संवाद मीडिया*

*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*

होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗

*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*

☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️

डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..

– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali

*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा