आरोसमधील मयत वायरमनच्या कुटुंबीयांना मदत
पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या लढ्याला यश : दोन लाख रुपये कुटुंबीयांकडे सुपूर्द
बांदा
आरोस-नाबरवाडी मध्ये सेवा बजावताना खांबावर मृत्यू झालेल्या अमोल भरत कळंगुटकर (वय 23) यांच्या कुटुंबीयांना अखेर वीज अधिकाऱ्यांनी दोन लाख रुपये मदत दिली तर उर्वरित मदत पंधरा दिवसांच्या आत दिली जाईल अशी ग्वाही दिली. अमोल कळंगुटकर मयत झाला अत्यंत वाईट झाले मात्र त्याला न्याय देण्यासाठी एकत्रितपणे लढा दिलेल्या हजारो नागरिकांच्या लढ्याला मात्र यश येत आहे.
जिल्ह्यात सेवा बजावताना मृत्यू झालेल्या घटनात आरोस गावातील सातवी घटना आहे. वीज वितरणकडून त्यांच्या वारसाला तुटपुंजी भरपाई दिली जाते, मात्र आरोस मध्ये वेगळीच परिस्थिती ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे निर्माण झाली. कुडाळ विभागीय कार्यालय कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी दि.16 रोजी अमोलच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये सुपूर्द केले. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे योजनेमधून दोन लाख रुपये, लोकवर्गणीतून एक लाख रुपये, अमोल कळंगुटकरच्या कुटुंबीयांना पंधरा दिवसात देणार असल्याची लेखी हमी दिली. तसेच मयत अमोल भरत कळंगुटकर हे पेन्शन योजनेसाठी पात्र असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना सदर पेन्शनची पंधरा हजार रुपये रक्कम मिळवून देणार असल्याचे सांगितले. सदर घटनेला कंत्राटदार अरिफ तांबोळी जबाबदार असून त्यांच्या कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी पंधरा दिवसात प्रस्ताव करू तसेच कंत्राटदार तांबोळी यांच्याकडून मृताच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, अमोल कळंगुटकर यांच्या कुटुंबीयांपैकी एका कोणाचाही शासकीय नोकरीकरिता शासनाकडे पाठपुरावा करू तसेच शाखा कार्यालय बांदा 2 चे सहाय्यक अभियंता अनिल यादव घटनास्थळी व शाखा कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे कुडाळ कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे यांनी लेखी स्वरूपात ग्रामस्थांना दिले.
एकंदरीत आरोस पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी आठ दहा तास एकाच जागेवर तळ ठोकल्याने मयत अमोल भरत कळंगुटकर यांना न्याय मिळत आहे. सर्वांच्या एकोप्यानेच व एकत्रीपणाने प्रशासनास नमती बाजू घ्यावी लागली अन कुटुंबीयांना भरपाई मिळाली हे एक उदाहरण समाजासमोर निर्माण झाले आहे.
पंधरा दिवसात मिळणार तीन लाख रुपये
कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून अमोल कळंगुटकर यांच्या कुटुंबीयांना पंधरा दिवसात उर्वरित तीन लाख रुपये मिळणार आहे. अमोल मयत झाला अत्यंत वाईट झाले, परंतु त्याच्यासाठी हजारो ग्रामस्थांनी दिलेल्या लढ्याला मात्र यश आले
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*