You are currently viewing “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान अंतर्गत भाजपा – वेंगुर्ले चा अमृत कलश राजन तेलीं कडे सुपुर्द

“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान अंतर्गत भाजपा – वेंगुर्ले चा अमृत कलश राजन तेलीं कडे सुपुर्द

वेंगुर्लेतील ९३ बुथ मधील अमृत कलश तालुका कार्यालयात एकत्रित केले…

 

वेंगुर्ले :

आज १८ ऑक्टोंबर रोजी २७० सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला मंडलाची सुपर वाॅरीयरांची बैठक सावंतवाडी विधानसभा निवडणुक प्रमुख व माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम अंतर्गत आप-आपल्या गावातील कलश माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख श्री. राजन तेली यांच्याकडे सुपूर्द केले व एकत्रित केलेला अमृत कलश प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना सुपूर्द करण्यात येणार आहे .

यावेळी मार्गदर्शन करताना राजन तेली म्हणाले की मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांच्या स्मरणार्थ या अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच देशभरातील अशा अमृत कलशातील माती गोळा करून दिल्ली येथे या मातीचा वापर करून शुरविरांच्या स्मरणार्थ “अमृत वाटिका ” ची निर्मिती करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सुहास उर्फ विनायक गवडळकर (तालुकाध्यक्ष), बाबली रामा वायंगणकर (तालुका सरचिटणीस), प्रशांत प्रभुखानोलकर (तालुका सरचिटणीस), विष्णू परब (सरपंच व सोशल मीडिया अध्यक्ष), मनवेल फर्नांडिस (जिल्हा का का सदस्य) प्रफुल्ल प्रभू, साईप्रसाद नाईक (जिल्हा का का सदस्य), सुषमा प्रभुखानोलकर (जिल्हा उपाध्यक्ष), स्मिता दामले (महिला मोर्चा अध्यक्ष), वसंत तांडेल (जिल्हा का का सदस्य), राजन गिरप (माजी नगराध्यक्ष), बाळा सावंत (जिल्हा का का सदस्य), निलेश सामंत (सरपंच कुशेवाडा), सत्याविजय गावडे (सरपंच अनसूर), संकेत धुरी (बूथ प्रमुख), गणपत माधव (सुपर वॉरियर्स), प्रणव वायंगणकर (युवा मोर्चा शहर अध्यक्ष), महादेव नाईक (शक्ती केंद्र प्रमुख), वसंत परब (सुपर वॉरियर्स), गुरुप्रसाद चव्हाण ग्रा. प.सदस्य (सुपर वॉरियर्स), विद्याधर धानजी (शक्ती केंद्र प्रमुख), कमलेश गावडे (शक्ती केंद्र प्रमुख), शंकर घारे (सुपर वॉरियर्स), रवी शिरसाट (बूथ प्रमुख), जगन्नाथ राणे (बूथ प्रमुख), राहुल गावडे, शरद मेस्त्री (ओबसी सेल), नितीन चव्हाण (शक्ती प्रमुख), महादेव नाईक, विजय बागकर (शक्ती केंद्र प्रमुख), घनश्याम सामंत (सुपर वॉरियर्स), सुधीर गावडे (शक्ती केंद्र प्रमुख), गावडे मॅडम (पाल सरपंच), जगन्नाथ राणे (शक्ती केंद्र प्रमुख), उत्तम कांबळी, शंकर घारे, राजबा सावंत(सुपर वॉरियर्स), संदीप देसाई (कार्यकर्ते) व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा