You are currently viewing श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा

श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा

श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा

प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटात श्रीवर्धन पारकर तर मोठ्या गटात आर्या दिघे प्रथम…

मालवण

भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटात श्रीवर्धन पारकर तर मोठ्या गटात आर्या दिघे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने १५ ऑक्टोबर हा दिवस डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावर्षी ३५० व्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी मनात व्हावा यासाठी शिवचरित्र आधारावर आणि इतर विषयांवर इयत्ता ३ री ते ५ वी व ४ थी ते ८ वी या दोन गटात प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. छोट्या गटासाठी परीक्षक सुधीर गोसावी तर मोठ्या गटासाठी शुभदा लुडबे यांनी काम पाहिले.

दोन्ही गटामधे मुलांचा चांगला सहभाग होता. परीक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करताना स्पर्धेची तयारी कशी करावी, वाचनाचे महत्व कायॽ, त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात हे सांगून मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- लहान गट- द्वितीय- पार्श्व प्रकाश शिरहट्टी, तृतीय- कु. शौनक शैलेश पावसकर, मोठा गट-द्वितीय- कु. वेदिका लुडबे, तृतीय- कु. अनुष्का गावकर.सूत्रसंचालन शांभवी कोळगे यांनी केले. वैदेही जुवाटकर यांनी आभार मानले. यावेळी नवीन बाल साहित्य, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व शिवरायांच्या जीवनावर लिहीलेली विविध लेखकांची ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मेधा शेवडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, कोषाध्यक्ष कोळंबकर, कार्यवाह वैदेही जुवाटकर, मानसी दूधवडकर, संतोष कोचरेकर आणि वाचक तसेच स्पर्धकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र व प्रथम तीन क्रमांकाना पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले. मुलांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
;

प्रतिक्रिया व्यक्त करा