कलंबिस्त हायस्कूलमध्ये अभिनव पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा.
सावंतवाडी
दिनांक १५ ऑक्टोबर, भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कलंबिस्त इंग्लिश स्कूल मध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ‘पाठ्य उतारा वाचन उपक्रमात’ प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी कलंबिस्त गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य श्री.रमेश दाजी सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील 165 विद्यार्थ्यांना वही व पेन असे शालोपयोगी साहित्य वितरण केले. त्याचप्रमाणे प्रशालेला चार खुर्च्या भेट दिल्या.प्रशालेतर्फे ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद सावंत व ज्येष्ठ लिपिक श्री.विष्णू पास्ते यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या दातृत्वबद्दल संस्थाध्यक्ष श्री.शिवाजी सावंत सर्व संस्था पदाधिकारी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अभिजीत जाधव व शिक्षिका श्रीम.विनिता कवीटकर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचे आभार मानले.यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले.
*संवाद मीडिया*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*
*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*
*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*
*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*
*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*
*आमचा पत्ता:-*👇
*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*
*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*
*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*