You are currently viewing भाजपाच्या वतीने आचरा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी जेरॉन फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा

भाजपाच्या वतीने आचरा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी जेरॉन फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा

मालवण :

 

मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या आचरा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी भाजपाच्या वतीने सरपंच पदाचे उमेदवार म्हणून आचरा गावातील लोकप्रिय व अजातशत्रू व्यक्तिमत्व जेरॉन फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा आचरा येथे जाहीर केली आहे.

आचरा येथील हॉटेल डॅफोडील येथे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी माहिती दिली. यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी सभापती नीलिमा सावंत, माजी जिप सभापती तथा सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, दीपक सुर्वे, डॉ. प्रमोद कोळंबकर, धंनजय टेमकर, चावल मुजावर, मंदार सरजोशी, अवधूत हळदणकर, रुपेश हडकर, किशोरी आचरेकर, किशोर आचरेकर, योगेश गावकर, पंकज आचारेकर, लवू घाडी, प्राजक्ता देसाई, प्रियता वायंगणकर, संतोष मिराशी, श्रुती सावंत, चंद्रकांत कदम, सायली सारंग, सारिका तांडेल, हर्षदा पुजारे, सचिन हडकर, केदार गावकर, विजय निकम, विरेश पवार यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. आचरा प्रभारी म्हणून संतोष गावकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याची माहिती चिंदरकर यांनी दिली.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे जेरॉन फर्नांडिस यांच्या उमेदवारीला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या नंतर वरिष्ठाशी बोलून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. सरपंच निवडणूक ही थेट जनतेतून असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

सदस्य पदासाठी अनेकजण इच्छुक उमेदवार आहेत. मात्र सदस्य पदाचे उमेदवारही लवकर जाहीर केले जातील. एकत्र उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. राज्यात भाजप शिवसेना मित्रपक्ष युती सरकार आहे. त्याचा विचार करता याठिकाणी युती म्हणून निवडणूक लढावण्याबाबत चर्चा सुरु आहे. वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील असे चिंदरकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा