बांदा केंद्रशाळेसाठी पालकांचे शाळा बंद आंदोलन सुरु…
बांदा
जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ च्या पालकांनी आज सकाळपासून शाळा बंद आंदोलन सुरु केले असून शेकडो पालक व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले आहेत. उपशिक्षणाधिकारी श्री थोरात व गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी याठिकाणी येत पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकांनी जोपर्यंत शाळेची इमारत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा पटसंख्या कमी असल्याने बंद पडत चालल्या आहेत. मात्र असे असताना जिल्ह्यात अशी एक शाळा आहे त्याला पटसंख्या जास्त असल्याने जागा कमी पडत आहे. जिल्ह्यात 283 एवढी सगळ्यात जास्त पटसंख्या असलेली बांदा केंद्र शाळा आहे. दरवर्षी या प्रशालेत इतर माध्यमातून किंवा शेजारील गावातील मुलांचा भरणा असतो. मात्र या शाळेच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या एका इमारतीचा एक खाजगी संस्था वापर करत आहे. सदर संस्थेचा आणि जिल्हा परिषदेचा भाडे करार संपुष्टात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भाडेकरार संपलेली इमारत तात्काळ जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १ च्या ताब्यात देण्याचे लेखी आदेश देऊनही प्राथमिक शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनावर पालक ठाम असून आज पासून शाळा बंद आंदोलन केले आहे. जोपर्यंत त्या इमारतीची चावी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही शाळा बंद आंदोलन करू असा इशारा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालकांनी दिला आहे. नेहमी मुलांच्या किलबिलाटाने गजबजली जाणारी भर बाजारपेठेत असणारी ही शाळा आज गजबजलेली दिसत नसून याठिकाणी शिक्षक आले असून पालकांच्या सूचनेनुसार ते बाहेर बसू न आहेत तर पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील या शाळेला आपल्या हक्काच्या जागेसाठी आंदोलन करावे लागते याकडे मा केसरकर यांनी लक्ष घालून योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी होत आहे यावेळी अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्यासह शाळा व्यवस्थापन सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*