You are currently viewing सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कामांबाबत आमदार, खासदारांकडून केवळ पेपरबाजी व फसवणूक – परशुराम उपरकर

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कामांबाबत आमदार, खासदारांकडून केवळ पेपरबाजी व फसवणूक – परशुराम उपरकर

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कामांबाबत आमदार, खासदारांकडून केवळ पेपरबाजी व फसवणूक – परशुराम उपरकर

मालवण

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्थितीबाबत स्थानिक आमदार, खासदार यांना अनास्था असून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कामांबाबत आमदार खासदार हे केवळ पेपरबाजी आणि फसवणूक करणारे नेते आहेत, अशी टीका मनसेचे राज्य चिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी करत किल्ल्याची अवस्था सुधारली गेली नाही तर सिंधुदुर्ग किल्ल्यात मनसेतर्फे नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छता व साफसफाई मोहीम आखली जाईल असे स्पष्ट केले.

मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत आज मालवणातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. यावेळी उपरकर यांनी शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवरायांचे दर्शन घेत श्रीफळ अर्पण केले. त्यानंतर त्यांनी शिवराजेश्वर मंदिरातील सभामंडप व सभोवताली फिरुन मंदिराच्या स्थितीचा आढावा घेतला आणि मानकरी श्री. पाडावे यांच्याशी मंदिर डागडुजी व सुशोभीकरणा बाबतीत चर्चा केली. त्यानंतर
नवरात्रौत्सवानिमित्त श्री देवी भवानी मंदीरात भेट देत दर्शन घेतले. त्याच प्रमाणे नौसेना दिना निमित्ताने किल्ले सिंधुदुर्गची सद्य स्थिती नेमकी कशी आहे त्याचाही आढावा उपरकर यांनी घेतला.

यानंतर बोलताना मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी सत्ताधारी तसेच स्थानिक आमदार व खासदार यांच्या किल्ले सिंधुदुर्गच्या अनास्थेबद्दल व सद्य स्थितीबाबत जोरदार टीका केली. आपण आमदार असताना तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी १ कोटी निधी किल्ल्याच्या डागडुजीसाठी जाहीर केला होता. पण १ कोटी यायला ११ वर्ष लागली. यावरूनच लोकप्रतिनिधी किल्ले सिंधुदुर्ग साठी किती जागृत आहेत हे समजते असे उपरकर म्हणाले. तसेच नौसेना दिन सोहळा हा भाजपचा खाजगी सोहळा नसून संपूर्ण देशाचा असल्याचे सांगत या सोहळ्यावर मनसेचे संपूर्ण लक्ष असेल असा इशारा उपरकर यांनी दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांचे नेहमीच काटेकोरपणे पालन मनसैनिक करत असतात आणि लवकरच त्यानुसार जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या होतील, असे सांगत त्यांनी काहीही झाले तरी मनसेचे सामाजिक कार्य चालूच आहे व राहील असेही उपरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी मनसे माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, मनविसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अमित इब्रामपूरकर, माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, हितेंद्र काळसेकर, माजी पदाधिकारी विल्सन गिरकर, विले पार्ले विभाग उपाध्यक्ष अभिजीत मेथर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल, मनविसेचे तालुका अध्यक्ष संदीप लाड, मनसे कट्टा पदाधिकारी कुणाल माळवदे, श्रीकृष्ण परब, संतोष सावंत, शहर अध्यक्षा भारती वाघ, भाग्यश्री लाकडे, प्राजक्ता आढाव, हेमंत उपरकर आदी आजी माजी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा