मुलांनी दररोज एक पुस्तक वाचले तर आपला भारत देश अधिक समृद्ध बनेल – डॉ. सौ. दीपाली काजरेकर
अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा…
मालवण
आज वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे चित्र असल्याने यात जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला पुन्हा पुस्तकांकडे वळले पाहिजे जसे गावोगावी मंदिरे असतात तिथे आपण देवाचे नामस्मरण करण्यासाठी जातो त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये एक ग्रंथालय झाले पाहिजे व त्या ग्रंथालयामध्ये गावातील व्यक्तींनी , मुलांनी दररोज जाऊन एक पुस्तक वाचले पाहिजे तरच आपला भारत देश अधिक समृद्ध बनेल असा आशावाद कुडाळ येथील जेष्ठ साहित्यिका डॉ सौ दीपाली काजरेकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती ,मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमा अंतर्गत कुडाळ येथील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. दिपाली काजरेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी माजी मुख्याध्यापक श्री. वामन खोत, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, सहाय्यक शिक्षक आर. डी. बनसोडे, सौ. संजना सारंग, सुनंदा वराडकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री. देसाई यांनी प्रास्ताविक केले. तर मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी स्वागत केले. श्रीमती. वराडकर यांनी परिचय करून दिला. यावेळी माजी मुख्याध्यापक वामन खोत यांनी तसेच दशरथ कवटकर यांनी वाचनाचे महत्व स्पष्ट केले. यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या प्रीती सावंत, हर्षाली धुरी, तन्वी मळेकर, प्रणया मांजरेकर या विध्यार्थिनींनी वाचलेल्या पुस्तकांवर मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. दिपाली काजरेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी संजना सारंग यांनी आभार मानले.
*संवाद मीडिया*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*
*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*
*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*
*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*
*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*
*आमचा पत्ता:-*👇
*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*
*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*
*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*