*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा”*
नवदुर्गा नारायणी नमोस्तुते
सर्व मंगल मांगल्ये जयोस्तुते।। धृ।।
घटस्थापना पहिली माळ लाल रंग
प्रतिक सुख समृद्धी चैतन्य त्याग
“शैलपुत्री”षडरिपू नियंत्रिते।।1।।
दुसरी माळ रंग निळा जगस्वामिनी
दुर्गेचे दुजे रूप आहे ब्रह्मचारिणी
मुक्ती शक्ती शांती प्राप्त करून देते।।2।।
पिवळा रंग तिसरी माळ समृद्धी
पंचमहाशक्ती देत पाप नाश कर्ती
“चंद्रघंटा”दशभुजा ज्ञान देते।।3।।
हिरवा रंग चौथी माळ सौभाग्याचा
प्रतीक नम्रता शांती संपन्नतेचा “कुष्मांडा”आयुरारोग्य बळ देते।।4।।
पाचवी माळ पारवा रंग शांत
महांकाली तमोगुणी सौष्ठव देत
“स्कंदमाता”भक्तांना नित्य वर देते।।5।।
सहावी माळ केशरी रंग विजयाचा
त्रिनेत्री वध करीते महिषासुराचा
श्री”कात्यायनी”पुरुषार्थ जागविते।।6।।
सातवी माळ श्वेत रंग स्वच्छता द्योत
स्त्री शक्ती आदर देवी पूजा होत
“काल रात्री”आद्यशक्ती सुफळ देते।।7।।
आठवी माळ रंग गुलाबी सात्विक
श्रद्धा एकाग्रता कर्तृत्वाचे प्रतिक
“महा गौरी”अज्ञान दैन्य दूर करते।।8।।
नववी माळ रंग संयमी जांभळा
तू ईशित्व वशित्व लधिमा गरिमा
“अष्टसिद्धी”दात्री प्राप्त करून देते।।9।।
नऊ दुर्गांची नऊ रूपे अनन्य
नऊ रात्रं दिवस पूजिती जन
सर्वांवरी कृपा करी जगन माते।।10।।
(माळे प्रमाणे वर्णन केलेले रंग प्रतिकात्मक समजावे)
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410 201.
Cell.9373811677.